चॅलेंज! समुद्रावर उडत असलेल्या पक्ष्याच्या फोटोतील ३ फरक शोधा, ३० सेकंदात जो शोधेल तो ठरेल बाजीगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:04 IST2026-02-11T15:53:46+5:302026-02-11T16:04:22+5:30
Optical Illusion : आजचे कोडे तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल. हे आव्हान स्वीकारायला तुम्ही तयार आहात का? समुद्रावर उडणाऱ्या एका पक्ष्याच्या दोन एकसारख्या दिसणाऱ्या चित्रांकडे नीट पाहा.

चॅलेंज! समुद्रावर उडत असलेल्या पक्ष्याच्या फोटोतील ३ फरक शोधा, ३० सेकंदात जो शोधेल तो ठरेल बाजीगर
(Image Credit : Brain Quiz)
Optical Illusion : “स्पॉट द डिफरन्स” सारखे पझल्स वेळ घालवण्यासाठी मजेशीर माध्यम असतात. ही कोडी अशा पद्धतीने तयार केली जातात की मेंदूला आणि डोळ्यांना सुद्धा थोडा व्यायाम मिळतो. या कोड्यांची संकल्पना सोपी आहे. तुम्हाला दिसायला अगदी सारखी चित्र दाखवली जातात, पण त्यातील छोटे छोटे फरक पहिल्या नजरेत दिसत नाहीत. जराही फोकस न हलू देता जर या चित्रांकडे बारकाईने बघायचं असतं आणि त्यातील फरक शोधायचे असतात. असाच एक कोडं आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला ३ फरक शोधायचे आहेत.
आजचे कोडे तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल. हे आव्हान स्वीकारायला तुम्ही तयार आहात का? समुद्रावर उडणाऱ्या एका पक्ष्याच्या दोन एकसारख्या दिसणाऱ्या चित्रांकडे नीट पाहा. ही चित्र जरी सारखी वाटत असली तरी त्यामध्ये ३ सूक्ष्म फरक लपलेले आहेत. तुम्ही ते शोधू शकता का? महत्वाची बाब म्हणजे हे फरक शोधण्यासाठी आपल्याकडे ३० सेकंदाची वेळ आहे. ३० सेकंदाच्या आतच फरक शोधले गेले पाहिजे. तरच यात मजा येईल.

"स्पॉट द डिफरन्स" या कोड्यांची खासियत म्हणजे यांच्या माध्यमातून टाईमपास तर चांगला होतोच. सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. तसेच आपली आयक्यू लेव्हलही टेस्ट केली जाते. म्हणूनच असे फोटो सोशल मीडियावर फारच लोकप्रिय ठरतात. लोक असे फोटो शेअर करून त्यातील फरक शोधण्याचं एकमेकांना चॅलेंज देत असतात.

तसा हा फोटो दिसायला फारच सोपा वाटतो. पण यात इतके बारीक फरक आहेत. जे सहजपणे लवकर शोधणं अवघडच आहे. अजूनही आपल्याला यातील फरक दिसले नसतील तर फोटो झूम करून बारकाईने बघा. नक्कीच आपल्याला यश मिळेल.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ३० सेकंदात आपल्याला या फोटोतील फरक दिसले असतील तर आपलं डबल अभिनंदन. कारण फोटोतील फरक शोधणं खरंच अवघड काम होतं. जर अजूनही फरक दिसले नसतील तर निराश होण्याचं कारण नाही. कारण यात काय फरक आहेत ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. जे बघून आपणही हे मान्य कराल की, हे कोडं खरंच अवघड होतं. खालच्या फोटोत आपण यातील फरक बघू शकता. तेही आपल्याला बारकाईने बघावे लागतील.

वरच्या फोटोत यातील ३ फरक सर्कल केलेले आहेत.