VIDEO : Tiktok वरील हे व्हायरल चॅलेंज केवळ महिला करू शकतात पुरूष नाही, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:25 PM2021-03-15T13:25:33+5:302021-03-15T13:41:43+5:30

Center of-gravity viral challenge tiktok : हे चॅलेंज पूर्ण करण्यात जास्तीत जास्त पुरूष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या चॅलेंजबाबत अनेकांमध्ये चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. 

Center of gravity viral challenge on tiktok which is mostly done by women and not by men | VIDEO : Tiktok वरील हे व्हायरल चॅलेंज केवळ महिला करू शकतात पुरूष नाही, जाणून घ्या कारण....

VIDEO : Tiktok वरील हे व्हायरल चॅलेंज केवळ महिला करू शकतात पुरूष नाही, जाणून घ्या कारण....

Next

भारतात टिकटॉक भलेही बॅन असलं तरी अजूनही काही देशांमध्ये लोक या App अनेक मजेदार चॅलेंज एकमेकांना देतात. गेल्या काही दिवसांपासून लाखों लोकांमध्ये एक चॅलेंज चांगलंच व्हायरल होत आहे. या चॅलेंजची खास बाब म्हणजे असा दावा केला जातोय की, हे चॅलेंज केवळ महिला पूर्ण करू शकतात. आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यात जास्तीत जास्त पुरूष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या चॅलेंजबाबत अनेकांमध्ये चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. 

सेंटर ऑफ ग्रॅविटी नावाच्या या चॅलेंजमध्ये एका महिला आणि एक पुरूष असतो. दोघांनाही आपल्या गुडघ्यांवर बसायचं असतं आणि मग पुढच्या बाजूने झुकायचं असतं. नंतर दोन्ही हात जमिनीवर  प्लॅंक एक्सरसाइजच्या पोजीशनमध्ये ठेवायचे आहेत आणि यानंतर हात पाठीमागे घेऊन वर करायचे आहेत. 

हे चॅलेंज करण्यात जवळपास सर्वच महिला यशस्वी ठरल्या आहेत. पण जास्तीत जास्त पुरूषांना हे काही जमलेलं दिसत नाही. पुरूष जेव्हा हात मागे घेतात तेव्हा ते खाली पडतात. हे चॅलेंज समोर आल्यावर अनेक लोक म्हणाले की, महिलांचं बॅलन्स फार चांगलं असतं. तर सोशल मीडियावर काही लोक म्हणाले की, महिलांची सेंटर ऑफ ग्रॅविटी पुरूषांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्या हे चॅलेंज पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

सायन्सचंही याबाबत हेच मत आहे. अकॅडमिक जर्नल थ्योरेटिकल बायोलॉजी अॅन्ड मेडिकल मॉडलिंगच्या एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, महिलांची सेंटर ऑफ ग्रॅविटी पुरूषांच्या तुलनेत ८ ते १५ टक्के लोअर असते. यामुळे महिलांना प्रेग्नेन्सी दरम्यान चालतानाही बॉडी बॅलन्स करण्यात मदत मिळते.
 

Web Title: Center of gravity viral challenge on tiktok which is mostly done by women and not by men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.