मांजरीने दिली अशी झुंज की शिकारी कोल्हे भीतीने पळून गेले, लोक म्हणाले हीच खरी वाघाची मावशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:02 IST2021-10-13T18:02:42+5:302021-10-13T18:02:52+5:30
एका मांजरीने सिद्ध करुन दाखवलंय की ती वाघाची मावशी आहेच. ती शिकारी कोल्ह्यांसोबत अशी काही भिडली की पुढच्या वेळी मांजरीसोबत पंगा घेताना कोल्हा नक्कीच विचार करेल.

मांजरीने दिली अशी झुंज की शिकारी कोल्हे भीतीने पळून गेले, लोक म्हणाले हीच खरी वाघाची मावशी
छोटीशी मनीमाऊ जास्तीत जास्त काय करु शकते. पंजाच मारेल. पण तुम्ही या भ्रमात राहु नका बरं. शेवटी तिला वाघाची मावशी म्हणतात ते उगीच नव्हे. एका मांजरीनं तर हे सिद्ध देखील करुन दाखवंलय. शिकारी कोल्ह्यांसोबत ती अशी काही भिडली की कोल्ह्यांना पळता भुई थोडी झाली. एका व्हिडिओमध्ये मांजर त्यांना अशी अद्दल घडवते की पुढच्या वेळी मांजरीसोबत पंगा घेताना कोल्हा नक्कीच विचार करेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांची या व्हिडिओला भरपूर पसंतीही मिळत आहे.
एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं की, ही मांजर खरंच आक्रमक निघाली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात दरारा. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, पुढच्या वेळी कोणाचीही शिकार करण्याआधी हे कोल्हे विचार नक्कीच करतील
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका घराच्या छतावरुन एक मांजर चाललेली असते. इतक्यात एक कोल्हा पुढून तर एक कोल्हा मागून तिच्यावर हल्ला करतो. यानंतर मांजर आक्रमक होते आणि निर्भीडपणे त्यांचा सामना करते. कोल्हेदेखील मांजरीचा राग पाहून घाबरतात आणि तिथून निघून जातात.
हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओ हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.