Viral Video: मांजर पाळणं पठ्ठ्याला पडलं महागात, केलं लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 21:00 IST2022-05-10T20:57:48+5:302022-05-10T21:00:25+5:30

एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एका मांजरीने तिच्या मालकाचे लाखोंचे नुकसान केले आहे.

cat destroys laptop video goes viral on internet | Viral Video: मांजर पाळणं पठ्ठ्याला पडलं महागात, केलं लाखोंचं नुकसान

Viral Video: मांजर पाळणं पठ्ठ्याला पडलं महागात, केलं लाखोंचं नुकसान

अनेकांना प्राणी पाळायला आवडतात. प्राण्यांमध्ये त्यांचा जीव रमतो. हा प्राणी त्यांच्या घरातल्या सदस्यासारखाच असतो. त्याची प्रत्येक गोष्ट त्यांना प्रिय असते. ते घरात कुठेही बागडु शकतात. घरातील प्रत्येक गोष्टींवर त्याचा हक्क असतो. अशावेळी ते घरातील वस्तूंचे नुकसानही करु शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एका मांजरीने तिच्या मालकाचे लाखोंचे नुकसान केले आहे.

व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की एक व्यक्ती लॅपटॉपवर व्हिडिओ बघत आहे. इतक्यात त्याची पाळीव मांजर त्याच्या लॅपटॉपचा चावा घेते. ते जेवण आहे असे तिला बहुदा वाटत असावे. ती सारखा सारखा त्याच्या लॅपटॉप ला कडकडुन चावा घेत असते आणि शेवटी मग होत्याचं नव्हतं होतं. म्हणजेच लॅपटॉपची स्क्रीन खराब होते. बहुतेक तो लॅपटॉपही खराब झाला आहे. हा लॅपटॉप अ‍ॅपलचा लॅपटॉप असावा असं वाटत आहे.

हा व्हिडिओ शेअर होताच त्यावर अनेकांनी कमेंट, लाईक केले आहे. अनेकांना त्या व्हिडिओतील लॅपटॉपच्या मालकाची दया येत आहे. मांजरीला पाळलंच कशाला असा प्रश्न त्याला विचारत आहेत.

Web Title: cat destroys laptop video goes viral on internet