कार पार्क करताना घामाघूम झाली तरूणी, शेवटी झालं असं काही - व्हिडीओने घातला धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 13:25 IST2021-04-15T13:20:20+5:302021-04-15T13:25:08+5:30
एक महिला तिची कार पार्क करण्यासाठी दोन कारच्या मधली जागा निवडते. त्यानंतर ती कार पार्क करण्यात अशी काही बिझी होते की, बघून तुम्ही हैराण व्हाल.

कार पार्क करताना घामाघूम झाली तरूणी, शेवटी झालं असं काही - व्हिडीओने घातला धुमाकूळ!
कार पार्किंग करणं तसं थोडं अवघड काम असतंच. पण इतकंही नसतं की, कार चालवणारी व्यक्ती कारमधून खाली उतरेल आणि कार जिथे पार्क करायची आहे ती जागा पायाने मोजेल. असं चित्र कधी पाहिलं नसेल तर आता बघा. कारण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला तिची कार पार्क करण्यासाठी दोन कारच्या मधली जागा निवडते. त्यानंतर ती कार पार्क करण्यात अशी काही बिझी होते की, बघून तुम्ही हैराण व्हाल.
महिलेचा हा कार पार्किंगचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. गाडी पार्क करण्यासाठी आधी ती तिची कार दोन कारच्या मधे नेते. पण तिला कार काही व्यवस्थित पार्क करता येत नाही. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा कार मागे-पुढे घेत प्रयत्न करत राहते. इतकंच काय तर महिला कारमधून खाली उतरून पार्किं :ग स्पेस पायांनी मोजते. पुन्हा तिचा तोच प्रयत्न सुरू होतो. (हे पण बघा : काय सांगता! न्यूड होऊन डोंगर सर करते ही तरूणी, फोटो व्हायरल झाले तर म्हणाली - 'ही एक कला आहे')
The way I screamed after watching the end of this video! 😩😩😩😂 pic.twitter.com/gTmu58sezO
— Stepmother of Dragons 🐲 (@cheembeam) April 12, 2021
अनेकदा प्रयत्न करूनही ती काही तिला हवी तशी कार पार्क करू शकत नाही. अशात तिच्या मदतीसाठी एक महिला येते. ती तिला गाइड करते आणि अखेर कार तिला हवी तशी पार्क होते. कार पार्क केल्यावर महिला फार आनंदी होते. आणि मदत करणाऱ्या महिलेचे धन्यवाद मानते. त्यानंतर ती मदत करणारी महिला तिथे पार्क केलेल्या दोन कारपैकी एक तिची कार घेऊन जाते. या व्हिडीओला आतापर्यंत २ कोटी १३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.