समोरच असलेला साप शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी सापडतो का....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:46 IST2020-04-16T12:46:24+5:302020-04-16T12:46:33+5:30

या व्हायरल झालेल्या फोटो एक साप आहे. पण अनेकांना शोधूनही यात साप दिसून येत नाहीये. बघा तुम्हीही ट्राय करा.

Can you found the snake in this viral photo api | समोरच असलेला साप शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी सापडतो का....

समोरच असलेला साप शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी सापडतो का....

अनेकदा काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात. पण ती नेमकी वस्तू सोडून आजूबाजूचं बाकी सगळं दिसतं. हा फोटो पाहूनही अनेकांना तसाच अनुभव येत आहे. या फोटोत जंगलातील केवळ झाडेच नाही तर एक सापही लपला आहे. पण तो साप लोकांना दिसत नाहीये. आता तुमच्याकडेही वेळ आहे तर बघा शोधा साप. जरा वेळही चांगला जाईल.

हा फोटो ऑस्ट्रेलियातील 'स्नेक कॅचर्स नॉर्दर्न रिवर्स 24/7' या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलाय. त्याला कॅप्शन दिलंय की, 'साप शोधा....बघुया तुम्ही या फोटोतील साप शोधू शकता की नाही'.

एकाला तर डायनासॉर सापडला....

अनेकांना शोधूनही यातील साप सापडला नाही. त्यांच्यासाठी साप कुठे आहे याचं उत्तरही आम्ही देतोय. पण आता वेळ आहेच तर जरा घ्या डोळ्यांची परीक्षा. 

आता लॉकडाऊन असल्याने अनेक लोक घरातच आहे. ते वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. अशात असा फोटो समोर आला तर वेळ चांगला जाऊ शकतो.

Web Title: Can you found the snake in this viral photo api