एक नाही तर तीन-तीन फरक आहेत 'या' एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत, ९० टक्के लोक शोधून शोधून दमले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:14 IST2025-12-24T15:14:10+5:302025-12-24T15:14:50+5:30
Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होतात, असाच एक वेगळा फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन फोटोतील फरक शोधायचा आहे.

एक नाही तर तीन-तीन फरक आहेत 'या' एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत, ९० टक्के लोक शोधून शोधून दमले
Optical Illusion : सोशल मीडियावर कितीही फोटो व्हायरल होऊ द्या, पण डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची मजाच काही वेगळी असते. या फोटोंमधील टाइमपास आणि मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो लहानांसोबत मोठ्यांनाही सॉल्व्ह करायला आवडतात. आपणही असे काही फोटो पाहिले असतील आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला असेल किंवा शोधल्या असतील. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होतात, असाच एक वेगळा फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन फोटोतील फरक शोधायचा आहे.
आपण पाहिलं असेल की, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. म्हणजे काही फोटोंमध्ये वस्तू किंवा प्राणी शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं, तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधण्याचं, तर काहींमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो. असाच हा फोटो आहे. आपण बघू शकता की, हॅमस्टर नावाचा एक प्राणी बेडवर झोपला आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण मुळात ते एकसारखे नाहीच. त्यांमध्ये ३ फरक आहेत. तेच आपल्याला २५ सेकंदात शोधायचे आहे. चला तर मग लागा कामाला....

आपल्याला कदाचित माहीत नसेल पण ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे केवळ टाइमपासचं साधन नाही तर याने मेंदू आणि डोळ्यांची कसरत होते. सोबतच आपली पर्सनॅलिटी टेस्ट होते आणि आयक्यू टेस्टही होते. त्यामुळे हे फोटो खास ठरतात. हा फोटो जर आपण बारकाईने पाहिला तर नक्कीच आपल्याला २५ सेकंदात यातील ३ फरक दिसून येतील. महत्वाची बाब म्हणजे २५ सेकंद ही वेळ भरपूर आहे. आपण जर जरा जास्त मेहनत घेतली तर नक्कीच ३ फरक शोधाल.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजेच २५ सेकंदात आपण या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत ३ फरक शोधले असतील तर आपलं अभिनंदन. जर नसतील दिसले तरी हरकत नाही. पुन्हा कधीतरी ट्राय करा किंवा यासाठीच जास्त वेळ घ्या. फक्त निराश होऊ नका. कारण यातील ३ फरक काय आहेत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते ३ फरक आपण बघू शकता.

वरच्या फोटोत तीन फरक सर्कल केलेले आहेत.