Optical Illusion : या दगडांमध्ये लपलं आहे एक हरिण, भले भले शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 09:42 IST2023-04-13T09:38:10+5:302023-04-13T09:42:33+5:30

Optical Illusion : हा फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलंय. या फोटोत एक प्राणी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला शोधणं सोपं नाही. या फोटोत लपलं आहे एक हरिण.

Can you find deer between the rocks optical illusion challenge | Optical Illusion : या दगडांमध्ये लपलं आहे एक हरिण, भले भले शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : या दगडांमध्ये लपलं आहे एक हरिण, भले भले शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे हजारो फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमधील रहस्य उलगडण्यात अनेकांना मजा येते. कधी फोटोत लपलेला प्राणी शोधायचा असतो तर कधी फोटोत काय दिसतं यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही समजतं. अशा गोष्टी लोकांना खूप आवडतात. असाच एक ऑप्टिकल फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलंय. या फोटोत एक प्राणी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला शोधणं सोपं नाही. या फोटोत लपलं आहे एक हरिण.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये चारही बाजूने दगडं दिसत आहेत. भर उन्हात फोटोग्राफरने हा फोटो क्लीक केला. आता यात लपलेलं हरिण लोकांना दिसत नाहीये. तुम्हाला यात हरिण शोधायचं असेल तर तुमची नजर तीक्ष्ण असली पाहिजे. कारण यात हरिण शोधणं सोपं नाही. या दगडांमध्येच कुठेतरी हरिण लपलं आहे. आजचं चॅलेंज या दगडांमधील हरिण शोधणं आहे. 

Mind oddities कडून हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला हरिण शोधायचं आहे. कारण यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. तयामुळे खूप बारकाईने तुम्हाला फोटो बघावा लागेल. हरणाचा रंग दगडांसोबत मॅच झाला आहे. त्यामुळे त्याला शोधणं अजून कठिण आहे. अजून दिसला नसेल तर उत्तर खाली आहे.

Web Title: Can you find deer between the rocks optical illusion challenge