हद्दच झाली! कॅफेने चक्क लिंबूपाण्यावर आकारला 'गॅस क्रायसिस चार्ज', बिल व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:50 IST2026-03-19T17:49:20+5:302026-03-19T17:50:32+5:30
बिलाचा फोटो व्हायरल होताच नेटीझन्स संतापले.

हद्दच झाली! कॅफेने चक्क लिंबूपाण्यावर आकारला 'गॅस क्रायसिस चार्ज', बिल व्हायरल...
Viral News : मध्यपूर्वेतील तणावामुळे भारतात LPG चा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. अशा परिस्थितीत, अनेक हॉटेल/रेस्टॉरंटने आपल्या खाण्याच्या बिलांमध्ये ‘गॅस क्रायसिस चार्ज’ आकारल्याचे समोर येत आहे. मात्र, बंगळुरूतील एका कॅफेने तर हद्दच केली. कॅफने ग्राहकांकडून चक्क थंड पेयांवर ‘गॅस क्रायसिस चार्ज’ आकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोशल मीडियावर या कॅफेचे बिल व्हायरल झाले असून, त्यात लिंबू पाण्यावर १७.०१ रुपये ‘गॅस क्रायसिस चार्ज’ लावण्यात आला. विशेष म्हणजे, या लिंबू पाण्यासाठीही तब्बल १७९ रुपये आकारण्यात आले आहेत. हे बिल एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @HaramiParindey या हँडलवरून शेअर करण्यात आले असून, त्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे.
“Gas crisis charge” on a lemonade 🤣
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) March 15, 2026
Source: r/bangalore pic.twitter.com/wkAU1QIsNl
या प्रकारावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी याला उघड लूट आणि दिवसाढवळ्या दरोडा असे संबोधले, तर काहींनी विनोदी प्रतिक्रिया देत नींबू गरम करून दिले का? असा सवाल केला.
दरम्यान, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, देशात एलपीजीची पूर्ण कमतरता नाही. सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा सुरळीत असून घरगुती वापरासाठी एलपीजीला प्राधान्य दिले जात आहे. साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय सुरू असून व्यावसायिक विक्री हळूहळू पूर्ववत होत आहे. मात्र, या घटनांमुळे ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांबाबत पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
डिस्क्लेमर: ही बातमी सोशल मीडिया अहवालांवर आधारित असून, संबंधित दाव्यांची आम्ही अधिकृत पुष्टी करत नाही.