'प्लास्टिक द्या, सोनं घ्या', भारतातील 'या' गावात सुरुय हटके योजना; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:29 IST2023-04-05T13:28:32+5:302023-04-05T13:29:09+5:30
या गावात प्लास्टिक मुक्तीसाठी हटके योजना राबविण्यात येत आहे.

'प्लास्टिक द्या, सोनं घ्या', भारतातील 'या' गावात सुरुय हटके योजना; नेमकं प्रकरण काय?
सध्या मार्केटमध्ये सोनं महागलं आहे, अनेकजण सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. पण, आपल्या देशातील एक गाव असं आहे, या गावात प्लास्टिक दिल्यानंतर तुम्हाला त्या बदल्यात सोनं मिळतं. जर तुम्ही जास्त प्लास्टिक दिले तर जास्त सोनं मिळते. ही योजना जाहीर होताच त्या गावातील कचराच संपला आहे, या योजनेमुळे आख्ख गाव काही तासातच स्वच्छ झालं आहे.
हे गाव सध्याच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. या गावाचे नाव सदिवारा असून, काही काळापूर्वी या गावच्या सरपंचाने प्लास्टिक प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. या गावचे सरपंच फारुख अहमद गणई यांना गाव प्लास्टिक प्रदूषणमुक्त करायचे आहे, व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र यात फारसे यश मिळाले नाही. मात्र, यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.
Optical Illusions : LION चे बरोबर स्पेलिंग कुठे लिहिले आहे? घारीची नजर असलेलेच ओळखू शकतात
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच यांनी 'प्लास्टिक दो और सोना लो' नावाची योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत कोणी २० क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणे दिले. मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोहिमेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही ही योजना राबवली आहे. सध्या आपल्या गावात बक्षीसाच्या बदल्यात पॉलिथिन देण्याचा नारा त्यांनी सुरू केला होता, जो यशस्वी झाल्याचे सरपंच सांगतात. मी नद्या-नाले स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता गावातील प्रत्येकाने आम्हाला स्वच्छता करण्यास मदत केली आहे, असंही सरपंचांनी सांगितले.