बुलफायटींग दरम्यान उद्ध्वस्त झालं प्रेक्षकांनी भरलेलं स्टॅंन्ड, बघून अंगावर येईल काटा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:00 IST2022-06-28T11:58:42+5:302022-06-28T12:00:22+5:30
Heavy Loss Due To Accident: ही स्पर्धा सर्वात जास्त जीवघेण्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. दरम्यान या स्पर्धेदरम्यान एका मैदानात असं काही झालं जे बघून मनात धडकी भरेल. या व्हिडीओत आधी तर तुम्हाला एक वळु दिसत आहे.

बुलफायटींग दरम्यान उद्ध्वस्त झालं प्रेक्षकांनी भरलेलं स्टॅंन्ड, बघून अंगावर येईल काटा...
Heavy Loss Due To Accident: बुलफायटींग एक फारच प्रसिद्ध आणि खतरनाक स्पर्धा आहे. केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी अशी स्पर्धा काही लोकांना वेडेपणा वाटतो. तर काही लोकांना हे रोमांचक वाटतं. तुम्ही अनेक वळुंना मनुष्यांना नुकसान पोहोचवताना पाहिलं असेल.
ही स्पर्धा सर्वात जास्त जीवघेण्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. दरम्यान या स्पर्धेदरम्यान एका मैदानात असं काही झालं जे बघून मनात धडकी भरेल. या व्हिडीओत आधी तर तुम्हाला एक वळु दिसत आहे. पण त्यानंतर जे काही दिसतं ते बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
@NoticiasCaracol@NoticiasUno@MONYRODRIGUEZOF Esto acaba de pasar en el Espinal - Tolima, hay varios heridos. pic.twitter.com/LFMMZteDiT
— Michael Ortiz Saiz (@michael_032) June 26, 2022
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, स्पर्धेत भाग घेणारे लोक वळुकडे लक्ष देऊन आहेत. त्यांना या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, काहीच सेकंदात त्यांच्यासोबत काय होणार आहे. अचानक लोकांनी भरलेलं ऑडिअन्स स्टॅन्ड खाली पडू लागतं आणि हे स्टॅन्ड पूर्णपणे मैदानावर पडतं. मैदानाच्या चारही बाजूने धावपळ सुरू होते.
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत या व्हिडीओला 51 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ पाहून थक्क झालेत. काही यूजर्स दु:खी झाले. लोकांनी कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.