शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Viral Video: एकाच वेळी १०० दुकाचींकवर चालवला बुलडोझर, भारतात नव्हे; 'या' देशात घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 12:47 IST

न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी शेकडो अवैध व धोकादायक दुचाकी वाहने बुलडोझरच्या मदतीने नष्ट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या कारवाईला महापौर स्वतः हिरवा कंदील दाखवत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसते आहे.

उत्तरप्रदेशात प्रचंड चर्चेत असलेला बुलडोझर आता अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात सुद्धा त्याचा जलवा दाखवत आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी शेकडो अवैध व धोकादायक दुचाकी वाहने बुलडोझरच्या मदतीने नष्ट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या कारवाईला महापौर स्वतः हिरवा कंदील दाखवत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसते आहे.

न्यूयॉर्क मधील रस्ते सुरक्षित करण्यासाठी डर्ट बाइक्स व एटीव्ही जप्त केल्या जात असून अशी वाहने नष्ट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. बुलडोझरने ही कारवाई करण्यामागे ज्या नागरिकांकडे अशी वाहने आहेत आणि ती बेकायदा वापरली जात आहेत त्यांना स्पष्ट संदेश देणे हा उद्देश आहे. महापौराच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या या बुलडोझर कारवाईत १०० वाहने चुरडून टाकण्यात आली. हा व्हिडीओ ट्वीटर वर शेअर करण्यात आला असून त्याखाली ‘आम्हाला दहशत नको आहे, अन्यथा कुचलून टाकू’ असे म्हटले गेले असून हा व्हिडीओ १५ लाख वेळा पाहिला गेल्याचे दिसून येत आहे.

महापौर म्हणाले, शहरात अशी अनेक वाहने आहेत, ज्याचा मालक वेगळा आणि चालविणारा वेगळा आहे. खरेदीची कागदपत्रे नाहीत. या वाहनाच्या सहाय्याने उपनगरे आणि शहरात अनेकदा स्थानिक लोकांना दहशत दाखवून लुबाडले जात आहे. ही एक टोळीच आहे. चोऱ्या करून अशी वाहने पळविली जातात. २०२१ पासून डर्ट बाइक्स आणि एटीव्ही जप्त करण्याची सुरवात झाली असून आत्तापर्यंत ९०० वाहने जप्त केली गेली आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर