डान्सफ्लोरवर आला दिर अन मग वहिनी, डीजेवर असे काही भन्नाट नाचले की तुम्हीही नाचायला लागाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:37 IST2021-08-19T19:31:19+5:302021-08-19T19:37:05+5:30
वहिनी-दिराचं नातं म्हणजे फक्त मजा, मस्ती आणि मस्करीच असते. अशाच एका वहिनी-दिराच्या भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

डान्सफ्लोरवर आला दिर अन मग वहिनी, डीजेवर असे काही भन्नाट नाचले की तुम्हीही नाचायला लागाल
वहिनी-दिराचं नातं शब्दात मांडणं अशक्यच. त्यांच नात कधी भावा-बहिणीसारखं असतं तर कधी मायलेकासारखं. ते एकमेकांचे घट्ट मित्र असतात. सासरी गेल्यावर अनेकींना आपल्या नवऱ्यानंतर सर्वात जवळचं दीर वाटत असतो. त्यांच्या नात्यात फक्त मजा, मस्ती आणि मस्करीच असते. अशाच एका वहिनी-दिराच्या भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तुम्ही व्हिडीओत पाहू शकता, वहिनीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तर दिराने फॉर्मल शर्ट पँट घातलं आहे. दोघंही डान्स फ्लोरवर डिजेच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांचे लटके-झटके पाहुन तुम्हालाही नाचावसं वाटेल. आपल्या लाडक्या वहिनीला नाचताना आनंदात पाहून दिरालाही तितकाच उत्साह वाटतो आहे. तोसुद्धा जोशात नाचत वहिनीला एकप्रकारे प्रोत्साहनच देतो आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ थोडा जुना आहे. पण लग्नाच्या मोसमात असे व्हिडिओ हमखास व्हायरल होतात. युट्युबवर हा व्हिडिओ अंकित जंगिद या युजरनं शेअर केलाय. या व्हिडिओला २ करोड ६० लाखाहुन अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. वहिनी-दिराची ही जोडी तुम्हालाही नक्कीच आवडेल.