शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: नवरी जोमात नवरा कोमात! रागाने ग्लासच फेकुन मारलं नवऱ्याला, लग्नाचा हा भन्नाट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 15:12 IST

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ नवरी आणि नवरदेवाचा (Viral Video of Bride and Groom) आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या स्टेजवरच असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहावा वाटेल. कारण हा जितका हैराण करणारा आहे, तितकाच मजेशीरही आहे.

देशभरात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावरलग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. लग्नातील व्हिडिओ अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ नवरी आणि नवरदेवाचा (Viral Video of Bride and Groom) आहे.

या व्हिडिओमध्ये लग्नाच्या स्टेजवरच असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहावा वाटेल. कारण हा जितका हैराण करणारा आहे, तितकाच मजेशीरही आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर उभा आहेत. यादरम्यान वरमाळेचा कार्यक्रम सुरू आहे. तेव्हाच नवरदेव नवरीला मिठाई खाऊ घालू लागतो. मात्र नवरीबाई एकदम रागात दिसते (Angry Bride Video).

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की नवरदेव नवरीला मिठाई खाऊ घालण्यासाठी हात पुढे करतो. नवरी ही मिठाई तर खात नाहीच पण नवरदेवाच्या हातातील मिठाई दूर फेकून देते. नव्या नवरीचं हे रूप पाहून सगळेच थक्क होतात. नवरीचं हे कृत्य पाहून नवरदेवासोबतच इतर नातेवाईकही हैराण होतात. यानंतर नवरदेवही नखरे दाखवायला सुरुवात करतो. नवरी जेव्हा नवरदेवाला ग्लासने पाणी पाजू लागते, तेव्हा नवरदेव पाणी पिण्यास नकार देतो.

नवरदेवाने पाणी पिण्यास नकार देताच नवरी पुन्हा भडकते आणि ती हातातील ग्लासही दूर फेकून देते. हे पाहून पाहुणे आणखीच हैराण होतात. लग्नातील हा अजब व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र पोट धरून हसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला गेला असून आतापर्यंत १ लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न