नवरीने नवरदेवाच्या गळ्यात असा टाकला हार, व्हिडीओ बघून लोटपोट होऊन हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:34 IST2024-05-11T15:19:42+5:302024-05-11T15:34:51+5:30
Funny Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव स्टेजवर एकमेकांच्या गळ्यात हार टाकताना दिसत आहे. पण दोघांचाही अंदाज फारच मजेदार आहे.

नवरीने नवरदेवाच्या गळ्यात असा टाकला हार, व्हिडीओ बघून लोटपोट होऊन हसाल!
Funny Video : सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्नातील अनेक अजब व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी लग्नाआधी नवरी पळून जाते तर कधी नवरदेव काहीतरी कारनामा करतात. अनेकदा तर अशा मजेदार घटना घडतात की, बघून पोटधरून हसायला येतं. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव स्टेजवर एकमेकांच्या गळ्यात हार टाकताना दिसत आहे. पण दोघांचाही अंदाज फारच मजेदार आहे.
इन्स्टावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव एका स्टेजवर हात घेऊन उभे आहेत. आधी नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार टाकते. पण नवरी हार नवरदेवाच्या गळ्यात नाही तर त्याच्या फेट्यावर टाकते आणि मागे सरकते. नंतर नवरदेवही दूरूनच हार नवरीच्या गळ्यात फेकतो. तो हारही खाली सरकत जातो. नवरदेवाचा चेहरा हाराने झाकला गेला आहे तर नवरीच्या गळ्यात हार नाही.
हा व्हिडीओ बघून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओला 68 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि कमेंट्सही भरपूर मिळाल्या आहेत. एकाने लिहिलं की, दोघांचे 36 पैकी 36 गुण मिळाले आहेत. दुसऱ्याने लिहिलं की, हे लग्न सक्सेस होईल, कारण दोघांनाही एकमेकांकडून काही आशा नाही. तर तिसऱ्याने लिहिलं की, नवरीला नवरदेव आवडलेला दिसत नाही.