भर लग्नमंडपात नववधूने अचानक सुरू केला असा प्रकार... VIDEO पाहून नेटकरी संतापले, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:20 IST2026-02-04T14:19:58+5:302026-02-04T14:20:37+5:30

Bride Marriage Viral Video: नववधूने केलेला असा प्रकार अनेकांना खटकला आहे

bride suddenly started wierd dancing thing at wedding hall netizens got angry after seeing viral video what happened | भर लग्नमंडपात नववधूने अचानक सुरू केला असा प्रकार... VIDEO पाहून नेटकरी संतापले, काय घडलं?

भर लग्नमंडपात नववधूने अचानक सुरू केला असा प्रकार... VIDEO पाहून नेटकरी संतापले, काय घडलं?

Bride Marriage Viral Video: हल्लीच्या लग्नांमध्ये नवरी-नवरदेवाचा डान्स ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, कधीकधी असा डान्स किंवा नवरीची वागणूक वादाचा विषय ठरतो. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यात ती तिच्या लग्नाच्या स्टेजवर येण्यापूर्वी भर लग्नमंडपात असे काही प्रकार करत आहे, ज्यामुळे नेटकरीही संतापले आहेत.

नेमका वाद काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये नवरी तिच्या प्रवेशाच्या वेळी मैत्रिणी आणि बहिणींच्या घोळक्यातून स्टेजकडे जात असते. यावेळी ती अत्यंत उत्साहात डान्स सुरू करते. तिची ही धमाल आणि डान्स करण्याची पद्धत लोकांना खटकली आहे. लग्नाचा मुहूर्त साधण्यासाठी नवरीला वेळेत स्टेजवर पोहोचणे आवश्यक असते. पण नवरी इतर मैत्रिणींना घेऊन डान्स करायला सुरुवात करते आणि एकत्रित डान्स करून लागते. हा प्रकार अनेकांना खटकला आहे. पाहा व्हिडीओ-

नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल झालेला हा व्हिडिओ 'एक्स' (ट्विटर) वर @renuy305 नावाच्या युजरने शेअर केला असून कॅप्शनमध्ये उपहासाने लिहिले आहे की, वराती आणि वऱ्हाडींना विनंती आहे की शक्य तितक्या लवकर जेवण उरकून घ्या, कारण नवरीच्या या वागणुकीमुळे कधीही वातावरण बिघडू शकते. अनेक युजर्सनी यावर टीका केली आहे. एकाने म्हटले की, ही नवरी तर खूपच जास्त व्हायरल झाली आहे. तर दुसऱ्याने मजेशीरपणे कमेंट केली की, वऱ्हाड्यांना आता 'फुल स्पीड' मोडमध्ये यावे लागेल, नाहीतर लग्नाऐवजी 'ॲडव्हेंचर' बनून जाईल.

Web Title : शादी में दुल्हन का डांस: लोगों ने जताई नाराजगी, वीडियो वायरल।

Web Summary : एक दुल्हन का शादी से पहले उत्साहपूर्वक नृत्य ऑनलाइन आलोचना का विषय बन गया है। नेटिज़न्स उसकी देरी से एंट्री और लापरवाह रवैये से नाराज़ हैं, उनका कहना है कि उसे मनोरंजन से ज़्यादा समारोह के समय को प्राथमिकता देनी चाहिए।

Web Title : Bride's dance at wedding sparks outrage; netizens react sharply.

Web Summary : A bride's enthusiastic dance before her wedding ceremony has drawn criticism online. Netizens are upset by her delayed entrance and carefree attitude, suggesting she should prioritize the ceremony's timing over entertainment.