अरे देवा! लग्नात हाराऐवजी गळ्यात टाकले खतरनाक साप, नवरदेवाने टाकला भलामोठा अजगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:13 IST2022-05-28T16:11:10+5:302022-05-28T16:13:58+5:30
Snake ki Jaimala: आपण सर्वांनीच पाहिलं आहे की, नवरी- नवरदेव फुलांचे हार एकमेकांच्या गळ्यात टाकतात. पण या लग्नात नवरी-नवरदेवाने यावेळी काय केलं ते बघून तुम्ही बोलती बंद होईल.

अरे देवा! लग्नात हाराऐवजी गळ्यात टाकले खतरनाक साप, नवरदेवाने टाकला भलामोठा अजगर
Snake ki Jaimala: आपल्या भारतातील लग्नांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज असतात. वेगवेगळ्या भागात लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धतीही असतात. पण आज तुम्हाला लग्नाचा एक असा व्हिडीओ दाखवणार, जो तुम्ही आधी कधी पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुम्ही घाबराल सुद्धा. आपण सर्वांनीच पाहिलं आहे की, नवरी- नवरदेव फुलांचे हार एकमेकांच्या गळ्यात टाकतात. पण या लग्नात नवरी-नवरदेवाने यावेळी काय केलं ते बघून तुम्ही बोलती बंद होईल.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव एकमेकांच्या गळ्यात हारांऐवजी खतरनाक साप टाकतात. हा प्रकार बघून यूजर्सची रात्रीची झोप उडाली आहे. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला. व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मोकळ्या मैदानात लग्न सुरू आहे. यादरम्यान बरेच पाहुणे उपस्थित होते. तुम्ही बघू शकता की, नवरी तिच्या हातात एक साप घेऊन येते आणि नवरदेवाच्या गळ्यात साप टाकते. त्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात एक अजगर टाकतो.
नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात साप आणि अजगर टाकतात. या व्हिडीओत ज्याप्रकारचं लग्न लोकांनी पाहिलं ते बघून लोक शॉक्ड झाले आहेत. लोक व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ psycho_biharii नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.