Viral Video: वधुने केले वरासोबत कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत धक्कादायक गोष्टी ...म्हणाली सही कर नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:11 IST2022-03-10T13:10:50+5:302022-03-10T13:11:37+5:30

नववधू (Bride) लग्नाआधीच वराला करारपत्रावर स्वाक्षरी करायला लावते, जेणेकरून लग्नानंतर त्याला आवडत नसलेले असे कोणतेही कृत्य करू नये.

bride made contract with groom video goes viral on internet | Viral Video: वधुने केले वरासोबत कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत धक्कादायक गोष्टी ...म्हणाली सही कर नाहीतर...

Viral Video: वधुने केले वरासोबत कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत धक्कादायक गोष्टी ...म्हणाली सही कर नाहीतर...

आजकालच्या लग्नांना केवळ प्रथा-परंपराच जोडल्या जात नाहीत, तर नवनवीन कार्यक्रमही पाहायला मिळतात. लग्नाला आलेल्या वराला आधी वहिनींचा सामना करावा लागतो आणि पैसे देऊन रिबन कापावी लागते. वधूदेखील लग्नात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे, की नववधू (Bride) लग्नाआधीच वराला करारपत्रावर स्वाक्षरी करायला लावते, जेणेकरून लग्नानंतर त्याला आवडत नसलेले असे कोणतेही कृत्य करू नये.

लग्नाच्या आधी वधू आपल्या खोलीत बसलेली दिसते. तिला जेव्हा लिफाफ्यात काय आहे, असे विचारले जाते तेव्हा वधू सांगते, की तिच्या भावी पती करणने करारावर स्वाक्षरी केली आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय आहे, हे नववधू वाचून दाखवते. यामध्ये सोबत वेळ घालवणे, दिवसातून तीनवेळा आय लव्ह यू म्हणणे, आपल्याशिवाय बार्बेक्यू पदार्थ खायचे नाहीत तसेच काही विचारेल तेव्हा सत्य सांगण्याची शपथ असे विविध करार केले आहेत.

हा गंमतीदार व्हिडिओ makeupbybhumikasaj या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. लग्नाआधी वधूकडून करारावर स्वाक्षरी करण्याचा थोडा नवीन ट्रेंड दिसत आहे. आगामी काळात पुन्हा असेच काहीसे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Web Title: bride made contract with groom video goes viral on internet