शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

Viral Video: ऊ अंटवा गाण्यावर वधुच्या पित्याचा भन्नाट डान्स, नेटीझन्स म्हणाले तुमचं वय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:20 IST

एका लग्नातील वधूच्या वडिलांचा डान्स (Bride’s Father Dance Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारतात लग्न सोहळे हे अगदी भव्यदिव्य असे साजरे केले जातात. काही ठिकाणी तर तीन किंवा अगदी चार दिवसही लग्न सोहळा सुरू असतो. हळद, संगीत कार्यक्रम, फेरे असे अनेक विधी लग्नांमध्ये पार पडतात. मात्र, लग्नात नाचण्याची मजा काही औरच असते. दोन्ही बाजूचे कुटुंबीय, मित्र मंडळी सगळे एकत्र येऊन वरातीमध्ये नाचताना (Indian Wedding Dance) दिसतात. कित्येक ठिकाणी वरात नसली, तरी वेडिंग हॉलमध्ये नाच-गाण्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवला जातो. अशाच एका लग्नातील वधूच्या वडिलांचा डान्स (Bride’s Father Dance Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, लग्नातील वधूपिता चक्क पुष्पा-द राईज या दाक्षिणात्य चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या गाण्यावर डान्स (Bride’s Father dance on O Antava) करताना दिसत आहे. यामध्ये त्याच्यासोबत इतर लोकही नाचत आहेत. मात्र, ज्या जोमाने वधूपिता नाचताना दिसत आहे, तो अन्य कुणामध्येच दिसत नाही. वधूपित्याची ही एनर्जी आणि डान्स यामुळेच हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर (O antava wedding dance viral video) करत आहेत.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राईज’ (Pushpa-The rise Movie) हा मूळचा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्येही सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणीदेखील मोठ्या प्रमाणात फेमस झाली आहेत. ‘ऊ अंटावा’ (O antava song) हे यातीलच एक आयटम साँग आहे, ज्यात साऊथची ग्लॅमरस अभिनेत्री समंथाने दिलफेक नृत्य केलं आहे.

अनुषा वेडिंग कोरियोग्राफी (Anusha Wedding Choreography) नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ‘व्हेन ब्राईड्स फादर टेक्स ओव्हर दी डान्स फ्लोअर’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमधील वधूपित्याचा डान्सही या कॅप्शनला साजेसा असाच आहे. या व्हिडिओला तब्बल 4 लाखांहून अधिक व्ह्यूज (O Antava dance viral) मिळाले आहेत, आणि ही संख्या वाढतच चालली आहे. कित्येक लोकांनी कमेंट्समध्ये या वधूपित्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे, तर कित्येकांनी या वयातही त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हल्ली लग्नांमध्ये विशेष कोरिओग्राफी करून डान्स बसवण्याचा ट्रेंड आहे. यासाठी कित्येक लोक लग्नाअगोदर महिनाभरापासून डान्स शिकतात. कित्येक कोरिओग्राफरही (Viral Wedding dance) केवळ लग्नासाठी खास असे डान्स बसवून देतात. तसेच, कित्येक वेडिंग प्लॅनर्स आपल्या पॅकेजमध्ये कोरिओग्राफरही उपलब्ध करून देतात. यामुळे लग्नामध्ये आता केवळ ‘नागिन डान्स’च नाही, तर इतर सर्व प्रकारचे डान्स पहायला मिळत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्यmarriageलग्न