Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

By Manali.bagul | Updated: December 4, 2020 20:22 IST2020-12-04T20:08:09+5:302020-12-04T20:22:06+5:30

Viral News in Marathi : लग्नात मेकअपमुळे मुलगी इतकी सुंदर दिसू लागते जितकी सुंदर ती अजिबात नसते. मुलीच्या मेकअपचीच चर्चा सर्वत्र होते.

Bride crying her makeup fed see what groom doing for her video viral | Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

लग्न समारंभात सुंदर आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आठवडाभर आधीपासूनच अनेकांची तयारी सुरू असते. त्यातल्या त्यात नवऱ्या मुलीचा थाट काही वेगळाच असतो. लग्नाच्या दिवशी आपण स्पेशल दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. सध्याच्या काळात लग्नासाठी वेगवेगळे मेकअप केले जातात. या मेकअप्समुळे तोंडाचा संपूर्ण लूकच बदलतो. तुम्ही तुमच्या फोनमध्ये मुलीचे मेकअपचे बिफोर आफ्टर असे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहत असाल. लग्नात मेकअपमुळे मुलगी इतकी सुंदर दिसू लागते जितकी सुंदर ती अजिबात नसते. मुलीच्या मेकअपचीच चर्चा सर्वत्र होते.

खरी मजा येते ती मुलगी सासरी जाताना . कारण मेकअप रडण्यामुळे खराब व्हायला सुरूवात होते. लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलीला रडू कोसळतं आणि मग तिच्या चेहऱ्याची काय अवस्था होते हे काही लग्नांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिवर व्हायरल (social media viral video) होतो आहे. या व्हिडीओत नवरी इतकी रडली इतकी रडली की तिच्या चेहऱ्यावरील मेकअप निघून तिचा चेहरा खराब झाला. राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

आपल्या माहेरच्यांच्या निरोप घेऊन ती सासरी जायला निघाली. तेव्हा तिला रडायला लागली. ती जशी रडायला लागली, तसं तिचा मेकअप हळूहळू निघू लागला. गाडीत बसल्यानंतर तर तिचा चेहरा खूपच बदलला. तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली की तिलाच तिची लाज वाटू लागली. तिची अशी अवस्था पाहून नवऱ्याला हसूच आलं पण आपल्या बायकोची त्याला दयाही आली. नवऱ्याने टिश्यूनं तो तिचा चेहरा पुसू लागला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सना  हसू अनावर झालं आहे. काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

Web Title: Bride crying her makeup fed see what groom doing for her video viral