Viral Video: काहीजण पळून जाऊन लग्न करतात, हे लग्न झाल्यानंतरही पळतायत; पाहा ही विचित्र परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:15 IST2022-05-02T16:08:13+5:302022-05-02T16:15:05+5:30
सध्या अशाच एका रुढीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात नवरा नवरी एक विचित्रच प्रकार करताना दिसत आहेत.

Viral Video: काहीजण पळून जाऊन लग्न करतात, हे लग्न झाल्यानंतरही पळतायत; पाहा ही विचित्र परंपरा
भारतात लग्नसराई म्हटली की अनेक परंपरा, रितीरिवाज पार पाडले जातात. यातील जास्त रिवाज हे वधुवरांशी संबधित असतात. काहीवेळा हे रिवाज अत्यंत मजेशीर असतात. खरंतर त्याचमुळे लग्नात रंगत येते. सध्या अशाच एका रुढीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात नवरा नवरी एक विचित्रच प्रकार करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की नवरा नवरी एका गाडीमागे जोरात धावत आहेत. त्यांच्याबरोबर वऱ्हाडीही धावत आहेत. अनेकांच्या मते ही लग्नातील एक परंपरा आहे. पण हे खरं आहे की नाही याचा दावा आम्ही करु शकत नाही. अनेकांना असंही वाटतंय की गाडी पकडण्यासाठी हे नवीन नवरा नवरी गाडीच्या मागे धावत आहेत.
या व्हिडिओला आतापर्यंत ८० लाख व्हिव्ज मिळाले आहेत. rkkhan6549 या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.