Video: हार घालताना एका व्यक्ती केलं असं काही, बघतच राहिली नवरी; मग आला मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 17:53 IST2022-02-01T17:52:03+5:302022-02-01T17:53:47+5:30
कोणत्याही लग्नात सर्वात जास्त मजा नवरी-नवरदेवाचे मित्र घेतात. रिवाजांदरम्यान ज्याप्रकारणे मित्र वागतात ते बघून नवरी-नवरदेवही हैराण होतात.

Video: हार घालताना एका व्यक्ती केलं असं काही, बघतच राहिली नवरी; मग आला मोठा ट्विस्ट
Wedding Viral Video: कोणत्याही लग्नात मजा-मस्ती, गमती-जमती नसल्या तर लग्नात आनंद वाटत नाही. कारण लग्नात सहभागी झालेल्या सर्वांना एन्जॉय करायचं असतं. अनेकदा तर लोक मजा-मस्तीच्या नादात असं काही करतात की, हैराण व्हायला होतं. सोशल मीडियावर नेहमीच लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंचा लोक आनंद घेतात. अशाच लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.
कोणत्याही लग्नात सर्वात जास्त मजा नवरी-नवरदेवाचे मित्र घेतात. रिवाजांदरम्यान ज्याप्रकारणे मित्र वागतात ते बघून नवरी-नवरदेवही हैराण होतात. अनेकदा हे बघून हसूही येतं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव एकमेकांना हार घालण्यासाठी तयार आहेत. तेव्हाच एक व्यक्ती नवरदेवाला वर उचलतो. अशात नवरी फक्त बघत उभी असते. ती नवरदेवाला हार घालू शकत नाही. तेव्हाच अचानक एक व्यक्ती येतो आणि नवरीला वर उचलतो. तो तिला काही लवकर खाली ठेवत नाही. त्यानंतर जे होतं ते बघून सगळेच हैराण झाले आहेत.
What happened here? 😁 pic.twitter.com/JRjHRJzKBm
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) February 1, 2022
हा नवरी-नवरदेवाचा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे आणि पुन्हा पुन्हा बघत आहे. शेअर करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ '@DoctorAjayita' नावाच्या यूजरने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलंय की, 'हे नेमकं काय होतंय?'. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलंय.