Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:35 IST2025-12-17T13:35:02+5:302025-12-17T13:35:37+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरीच्या मैत्रिणी घोळक्यात उभ्या आहेत. त्या छान नटलेल्या दिसत आहेत, पण त्यांच्या अंगावर 'स्नो स्प्रे'चा जाड थर साचला आहे.

Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
लग्नात नवरदेवाच्या मित्रांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नवरीच्या मैत्रिणी नवरदेवाचे बूट चोरण्याच्या तयारीत असतात, तर नवरदेवाचे मित्रही मोठ्या निष्ठेने बुटांचं रक्षण करताना दिसतात. काही वेळा नवरदेवाचे मित्र नवरीकडच्या लोकांशी हुज्जत घालताना किंवा थट्टा-मस्करी करताना दिसतात. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ या सर्वांपेक्षा अगदी वेगळा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरीच्या मैत्रिणी घोळक्यात उभ्या आहेत. त्या छान नटलेल्या दिसत आहेत, पण त्यांच्या अंगावर 'स्नो स्प्रे'चा जाड थर साचला आहे. त्याच वेळी एका तरुणीच्या हातात पूजेचं ताट दिसत आहे. इतक्यात त्यांच्यापैकी एक मुलगी अंगावर स्प्रे उडवणाऱ्या तरुणाच्या अंगावर धावून जाते. मात्र, पुढच्याच क्षणी वऱ्हाडी मंडळी स्नो स्प्रेचा असा काही वर्षाव करतात की, तिन्ही मुली त्या स्नोमुळे दिसतही नाहीत.
नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला 'स्नो स्प्रे'ने आंघोळ घातल्याच म्हटलं जात आहे. यामुळे नवरीचा आणि तिच्या मैत्रिणीचा, बहिणीचा मेकअपच वाया गेल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले असून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. @irfan नावाच्या हँडलवरून १४ डिसेंबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.
९ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केला असून १३ हजारांहून अधिक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर हजारो युजर्सनी आपलं मत मांडलं आहे. काही युजर्सनी विचारलं की, "हे लग्न आहे की होळी?". तर काहींनी म्हटले की, "लग्नात अशा गोष्टी व्हायलाच नकोत." एका युजरने "आमच्याकडे असं झालं असतं तर आतापर्यंत अख्ख्या वऱ्हाड्यांना बदडून काढलं असतं!" असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.