बोंबला! तारांच्या मदतीने हवेत लटकून कपलचं लग्न, फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:51 IST2019-09-20T12:44:47+5:302019-09-20T12:51:36+5:30
काही लोकांच्या डोक्यात विचित्र किंवा वेगळ्याप्रकारे लग्न करण्याचं खुळ भरलेलं असतं. त्यांना वाटत असतं की, त्यांचं लग्न फारच वेगळ्या पद्धतीने व्हावं आणि नेहमीसाठी लक्षात रहावं.

बोंबला! तारांच्या मदतीने हवेत लटकून कपलचं लग्न, फोटो व्हायरल...
काही लोकांच्या डोक्यात विचित्र किंवा वेगळ्याप्रकारे लग्न करण्याचं खुळ असतं. त्यांना वाटत असतं की, त्यांचं लग्न फारच वेगळ्या पद्धतीने व्हावं आणि नेहमीसाठी लक्षात रहावं. एक असंच अनोखं लग्न जर्मनीमध्ये नुकतंच पार पडलं. या अनोख्या लग्नाची चर्चा तर रंगली आहेच, सोबतच फोटोही व्हायरल झाले आहेत.
येथील एका कपलने तारांच्या मदतीने हवेत लटकत लग्नाचा विधी पार पाडला. नवरीचं नाव एना ट्रेबर असून ती एका हाय-वायर आर्टिस्ट आहे. एना तार आणि दोरीवर स्टंट करते. तिच्या पतीचं नाव आहे स्वेन लियन.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनाचे वडील जॉन ट्रेबर सुद्धा एक हाय-वायर आर्टिस्ट आहेत. दोरीवरून पाळणा एका टोकाहून दुसऱ्या टोकावर घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलं आहे.
लग्नात आलेले पाहुणे सुद्धा हे सगळं पाहून हैराण आणि आश्चर्यचकित झाले होते. सोशल मीडियातून त्यांचे फोटो व्हायरल झाल्यावर लोकांनीही त्यांच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे.