Video : गॅंगस्टर मुलगी बनून तुरूंगातून पसार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 12:30 IST2019-08-06T12:23:02+5:302019-08-06T12:30:29+5:30

तरूंगातून पळून जाण्यासाठी गुन्हेगार भींती फोडताना अनेकदा अनेक सिनेमातून पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात तरूंगातून पळून जाण्यासाठी एका गुन्हेगाराने असं काही केलं की, कुणाचा विश्वासच बसणार नाही.

Brazilian criminal dressed up as daughter gets caught escaping prison | Video : गॅंगस्टर मुलगी बनून तुरूंगातून पसार, पण...

Video : गॅंगस्टर मुलगी बनून तुरूंगातून पसार, पण...

तरूंगातून पळून जाण्यासाठी गुन्हेगार भिंत फोडताना तुम्ही अनेकदा अनेक सिनेमातून पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात तरूंगातून पळून जाण्यासाठी एका गुन्हेगाराने असं काही केलं की, कुणाचा विश्वासच बसणार नाही. ही घटना आहे ब्राझीलची. इथे एका गॅंगस्टरने तुरूंगातून पळून जाण्यासाठी मुलीचं रूप घेतलं. तो मुलीच्या रूपात तरूंगातून बाहेरही पडला, पण नंतर त्याला पुन्हा पकडण्यात आलं.

Clauvino da Silva सध्या रिओच्या एका तुरूंगात बंद आहे. त्याने आयडियाची कल्पना लावत सिलिकन गर्ल मास्क घातला होता. त्याने डोक्यावर विगही घातला होता. त्याने मुलीसारखं मेकअप करून तुरूंगात पलायन केलं. पण त्याला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आलं. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून यात हा गॅंगस्टर त्याचं मेकअप काढताना दिसत आहे.

स्वत:च्या मुलीचं घेतलं रूप

सिल्वाची मुलगी त्याला तुरूंगात भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा त्याने मुलीला तुरूंगातच ठेवले आणि तो पळाला. तुरूंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिल्वाने गुलाबी टी-शर्ट घातली, लांब केस लावले, टाइट जीन्स घातली, पांढऱ्या सॅंडल्स, कोट आणि चष्म्याचा वापर केला होता. मात्र, त्याला पुन्हा पकडण्यात यश आलं. पोलिसांना त्याच्या चालण्यावरून संशय आला होता. त्यामुळे त्याला लगेच पकडलं गेलं. 

Web Title: Brazilian criminal dressed up as daughter gets caught escaping prison