कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी घरात लागलेल्या भयंकर आगीत घेतली त्याने उडी आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 12:47 IST2019-03-14T12:44:38+5:302019-03-14T12:47:14+5:30

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून यातील एका व्यक्तीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.

This brave man ignores firefighters runs into his burning house video goes viral | कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी घरात लागलेल्या भयंकर आगीत घेतली त्याने उडी आणि....

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी घरात लागलेल्या भयंकर आगीत घेतली त्याने उडी आणि....

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून यातील एका व्यक्तीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. झालं असं की, एका घरात भयंकर आग लागली होती आणि या व्यक्तीचा कुत्रा घरातच राहिला होता. त्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना सांगितले की, कुत्र्याचा जीव वाचवा. पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग त्याने असं काही केलं की, सर्वजण बघतच राहिले.


या व्यक्तीची पत्नी आणि तीन मुलींची या आगीतून आधीच सुरक्षित सुटका करण्यात आली होती. पण कुत्रा मात्र आतच अडकला होता. या कुत्र्याचं नाव Gabanne असं आहे. या व्हिडीओत हा व्यक्ती कशाप्रकारे आगीची चिंता न करता घरात घुसतो आणि कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढतो. यात त्या व्यक्तीला इजाही झाली आहे. 



सोशल मीडियात हा व्हिडीओ पाहून लोक त्याचं कौतुक करत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत आहेत. 

Web Title: This brave man ignores firefighters runs into his burning house video goes viral