चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा श्रीमंत महिलेचा हात, अनेकजण झाले फेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:32 IST2024-01-09T13:27:13+5:302024-01-09T13:32:37+5:30

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला महिलांचे तीन हात दिसत आहेत. फोटोत दिसणाऱ्या महिलांच्या या तिन्ही हातांवरून यातील श्रीमंत महिलेचे हात शोधायचा आहे. 

Brain Teaser Challenge : Find the rich woman quiz personality iq test | चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा श्रीमंत महिलेचा हात, अनेकजण झाले फेल...

चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा श्रीमंत महिलेचा हात, अनेकजण झाले फेल...

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन किंवा माइंड गेम्सचे फोटो व्हायरल होत असतात. यांमध्ये लपवलेलं काहीतरी शोधायचं असतं किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. याद्वारे तुम्ही तुमची आयक्यू टेस्ट करू शकता. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला महिलांचे तीन हात दिसत आहेत. फोटोत दिसणाऱ्या महिलांच्या या तिन्ही हातांवरून यातील श्रीमंत महिलेचे हात शोधायचा आहे. 

या फोटोद्वारे तुमचं मनोरंजन तर होईलच सोबतच तुमच्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होईल. कारण यातील उत्तर शोधणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. याने तुमची दृष्टी किती चांगली आहे हेही कळेल.

तुमचं चॅलेंज या फोटोतील चूक शोधणं हे आहे आणि श्रीमंत महिलेचा हात शोधणं आहे. त्यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. या फोटोत तीन महिलांचे हात आहेत. ज्यांची नावे सारा, पॅम आणि जेसिका आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता का की, यातील श्रीमंत महिलेचा हात कोणता आहे. 

या फोटोतील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीनिअस असणं गरजेचं नाही. फक्त थोडा विचार करावा लागेल आणि बारकाईने फोटो बघावा लागेल. तेव्हाच तुम्ही यातील बरोबर उत्तर देऊ शकाल. 

काय आहे उत्तर?

साराकडे एक नकली घड्याळ आहे, पॅमचं सोन्याचं ब्रेसलेट जरा खराब झालेलं आहे. पण जेसिकाच्या ब्रेसलेटमध्ये खरे टिफनीचे स्टोन लागले आहेत. त्यामुळे याचा अर्थ होतो की, जेसिका सगळ्यात श्रीमंत महिला आहे.

जर तुम्हाला यातील उत्तर 5 सेकंदात सापडलं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर निराश होण्याची गरज नाही. 

Web Title: Brain Teaser Challenge : Find the rich woman quiz personality iq test