गर्लफ्रेंडला मुर्ख बनवायला गेला अन् त्याचा प्रँक स्वत:वरच उलटला, पुन्हा मस्करी करायला जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 16:56 IST2021-08-29T16:50:05+5:302021-08-29T16:56:30+5:30

एक गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडच्या प्रँकचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात बॉयफ्रेंड प्रँक करायला गेला खरा पण त्यात त्याचीच फजिती झाली.

boyfriend prank with girlfriend funny video goes viral on social media | गर्लफ्रेंडला मुर्ख बनवायला गेला अन् त्याचा प्रँक स्वत:वरच उलटला, पुन्हा मस्करी करायला जाणार नाही

गर्लफ्रेंडला मुर्ख बनवायला गेला अन् त्याचा प्रँक स्वत:वरच उलटला, पुन्हा मस्करी करायला जाणार नाही

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडच्या नात्यात मस्करी किंवा थट्टा नसली तर त्या नात्याला काही मजा नाही. बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला हसवण्यासाठी काही ना काहीतरी प्रँक करतच असतो. पण समजा हे प्रँक त्याच्यावरच उलटलं तर. असाच एक गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडच्या प्रँकचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात बॉयफ्रेंड प्रँक करायला गेला खरा पण त्यात त्याचीच फजिती झाली.

या व्हिडिओत ब़ॉयफ्रेंड एका भांड्यात पाणी भरताना दिसत आहे. त्यानंतर मुलाने भांड्याच्या खालच्या बाजूला चिकटपट्टी लावली आणि ते किचनच्या ओट्यावर ठेवले. चिकटपट्टीमुळे पाण्याचे भांडे ओट्याला चिकटले. त्याचनंतर त्याची गर्लफ्रेंड त्याठिकाणी आली. तिने ते ओट्यावरील भांडे उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भांडे चिकटल्यामुळे उचलले जात नव्हते. त्यामुळे वैतागून मुलीने भांडे पूर्ण जोर लावून उचलले आणि भांड्यातील सर्व पाणी तिच्या अंगावर सांडले. हे पाहून बॉयफ्रेंड जोरजोरात हसतो. मात्र या प्रकारामुळे चिडलेली गर्लफ्रेंड त्याचाच अंगावर पाणी ओतते.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवरील लोकांच्या कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

Web Title: boyfriend prank with girlfriend funny video goes viral on social media