बाबो! भल्यामोठ्या कोब्रासोबत हा करतोय नागिन डान्स, लोक म्हणाले अरे जीव स्वस्त झालाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:19 IST2021-11-08T14:14:14+5:302021-11-08T14:19:33+5:30

एक मुलगा जाएंट किंग कोब्रा सोबत खेळताना दिसत आहे. हा मुलगा ज्या पद्धतीने हातात कोब्रा घेऊन नाचतो, ते दृश्य खूपच धक्कादायक आहे.

boy dancing with cobra shocks netizens as video goes viral | बाबो! भल्यामोठ्या कोब्रासोबत हा करतोय नागिन डान्स, लोक म्हणाले अरे जीव स्वस्त झालाय का?

बाबो! भल्यामोठ्या कोब्रासोबत हा करतोय नागिन डान्स, लोक म्हणाले अरे जीव स्वस्त झालाय का?

इंटरनेटवर लोक व्हिडिओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या हव्यासापोटी आपला जीव पणाला लावतात. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. ज्यामध्ये एक मुलगा जाएंट किंग कोब्रा सोबत खेळताना दिसत आहे. हा मुलगा ज्या पद्धतीने हातात कोब्रा घेऊन नाचतो, ते दृश्य खूपच धक्कादायक आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगा घरात एका महाकाय काळ्या कोब्राजवळ बसला आहे. तर आणखी दोन लहान मुलं दरवाजाजवळ उभी असलेली दिसतात. या दरम्यान मुलगा कोब्राला हाताने धरतो. कोब्रा किती भयावह दिसतोय हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पण मुलगा त्याला अजिबात घाबरत नाही. तो त्याच्यासोबत नाचत राहतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोब्राने मुलाला अजिबात इजा केली नाही. अन्यथा असा महाकाय नाग क्षणात चावा घेऊ शकतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरला शेअर केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर सतत प्रतिक्रिया देत आहेत.

यानंतर हा मुलगा जिवंत आहे की नाही, असा प्रश्न एका यूजरने विचारला आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Web Title: boy dancing with cobra shocks netizens as video goes viral