Video : 'या' अवलियाच्या अदांचा सोशल मीडियात धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:48 IST2018-08-07T15:45:00+5:302018-08-07T15:48:35+5:30
काही दिवसांपूर्वीच भोपाळचे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव म्हणजेच डांसिंग अंकलचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले होते. डांसिंग अंकल रातोरात स्टार झाले होते.

Video : 'या' अवलियाच्या अदांचा सोशल मीडियात धुमाकूळ!
मुंबई : सोशल मीडियामुळे अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी एका चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अनेकजण या सोशल मीडियात आपले व्हिडीओ शेअर करुन स्टारही झाले आहेत. यातील काहींना चांगली संधी मिळाली. पण काही लोक असेही काही व्हिडीओ शेअर करतात जे बघून कुणालाही हसू आवरता येणार नाही.
काही दिवसांपूर्वीच भोपाळचे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव म्हणजेच डांसिंग अंकलचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले होते. डांसिंग अंकल रातोरात स्टार झाले होते. आता त्यांच्यानंतर एका तरुणाच्या डान्स व्हिडीओंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. हे व्हिडीओ राव नरेन या नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
या तरुणाचे डान्स व्हिडीओ पाहून सोशल मीडियातील काही यूजर्सनी त्याला 'गल्ली बॉय' असे नावही दिलंय. या तरुणाने ९० च्या दशकातील अनेक गाजलेल्या गाण्यांवर डान्स केलाय? आता डान्स केलाय की, अजून काही ते तुम्हीच बघा आणि ठरवा...
खरंतर इतका वाईट डान्स तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. त्यामुळेच या तरुणाच्या डान्सची खिल्ली सोशल मीडियातून उडवली जात आहे. हा मुलगा कोण? त्याचं नाव काय आहे? याची काहीही माहिती मिळाली नाहीये.