माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:51 IST2025-11-22T17:47:35+5:302025-11-22T17:51:09+5:30
काही ऑफिसमधील कल्चर इतकं टॉक्सिक आहे की, त्यांनी कर्मचाऱ्याला पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळीही काम करायला सांगितलं आहे.

Photo Credit: Unsplash, Reddit
आई-बाबा होणं हा कपलसाठी आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने ऑफिसपेक्षा आपली पत्नी आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं पाहिजे. पण काही ऑफिसमधील कल्चर इतकं टॉक्सिक आहे की, त्यांनी कर्मचाऱ्याला पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळीही काम करायला सांगितलं. रेडीटवर एका युजरने आपल्या बॉससोबतच चॅट शेअर केलं आहे.
"माझ्या पत्नीला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मी माझ्या मॅनेजरला सांगितलं आणि फक्त दोन दिवसांची सुटी मागितली. साधी सहानुभूती दाखवण्याऐवजी, बॉसने मला माझी सुटी पुढे ढकलण्यास सांगितली आणि "तुझे मम्मी-पप्पा हे मॅनेज करू शकतात का?" असा प्रश्न विचारला. मला रुग्णालयातून काम करण्यास सांगितलं."

"संभाषणादरम्यान, मला पूर्णपणे असहाय्य वाटलं. ज्या वेळी मी माझ्या पत्नीवर आणि माझ्या नवजात बाळावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं तेव्हा मी लॅपटॉप घेऊन हॉस्पिटलच्या खोलीत का बसू शकत नाही हे समजावून सांगण्यात व्यस्त होतो." कर्मचारी पुढे म्हणतो, "सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मी हे काम सोडू शकत नाही. मला एक मूल आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या वाढत आहेत.

"माझ्या कंपनीतील परिस्थिती अशी आहे की जर मी जास्त काही बोललो तर मला कामावरून काढून टाकलं जाण्याची भीती वाटते. मला माहित नाही की भारतीय मॅनेजर अजूनही असं का मानतात की कर्मचाऱ्यांनी पर्सनल आयुष्य जगू नये, अगदी मुलाच्या जन्मासारख्या मोठ्या घटनेच्या वेळीही. मला फक्त माझं मत व्यक्त करायचं होतं. इतर कोणालाही असेच काही अनुभव आले आहे का?" या पोस्टवर आता लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.