Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:38 IST2025-06-27T15:37:44+5:302025-06-27T15:38:48+5:30

Canadian convocation Viral Video: कॅनडामध्ये पदवी घेण्यासाठी स्टेजवर गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याने बोल शंकर भगवान की जय, अशी घोषणाबाजी केली.

Bol Shankar bhagwan ki jai; Indian students viral moment at Canadian convocation | Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

कॅनडात शिकायला गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दीक्षांत समारंभात संबंधित विद्यार्थ्याने थेट स्टेजवर जाऊन शंकर भगवान की जय, असा नारा दिला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.  सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामुदायिक उत्सवाचा एक दुर्मिळ क्षण असे याचे वर्णन केले जात आहे. 

राहूल छिल्लार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो दिल्लीतील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने सास्काचेवान पॉलिटेक्निकमधून पदवी प्राप्त केली. पदवी घेताना राहुलने शंकर भगवान की जय, असा नारा दिला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहुल स्टेजवर येतो आणि मायकवर  शंकर भगवान की जय असा नारा देतो. त्यानंतर पदवी देण्याऱ्यासोबत हास्तांदोलन करतो आणि आपली पदवी घेऊन स्टेजवरून खाली उतरतो.


rahulchhillar34 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून १ जून २०२५ रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.  या व्हिडीओला जवळपास २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, ३ कोटी लोकांना या लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की लोकांनी तो फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करायला सुरुवात केली. 

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून राहुलचे कौतुक केले. तर, संबंधित तरुणाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी निंजा टेक्नीक वापरल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे." दुसऱ्याने म्हटले आहे की, "राहुलच्या या व्हिडिओवरून असे दिसून येते की परदेशात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी देखील त्यांची संस्कृती आणि परंपरा विसरत नाहीत." तिसऱ्याने म्हटले आहे की, "भाऊ, भारत माता की जय बोलाला असता तर चांगले झाले असते." चौथ्याने म्हटले आहे की, "अंधभक्ताला माहित होते तो प्रसिद्ध होईल, प्रसिद्ध होण्याची ही निंजा टेक्निक आहे."

Web Title: Bol Shankar bhagwan ki jai; Indian students viral moment at Canadian convocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.