BJP candidate bisahulal singh showing revolver congress set to complain election commission | '....तो गोली मार दूंगा', कार्यकर्त्याला रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या BJP नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

'....तो गोली मार दूंगा', कार्यकर्त्याला रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या BJP नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

बिहारपाठोपाठच मध्यप्रदेशातही पोट निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. अशात एका भाजप उमेदवाराचा (BJP Bisahu lal singh) यांचा  हातात रिव्हॉल्व्हर घेऊन कार्यकर्त्यालाच धमकावतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका खासगी बैठकीदरम्यान हा व्हिडीओ कोणीतरी गुपचूप काढला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मंत्रीपद असलेले भाजपचे नेते थेट अपशब्द वापरत बंदूकीचा धाक दाखवत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्यावर काँग्रेसने टीकेचा भडीमार सुरू केला आहे. 

या प्रकारानंतर काँग्रेसच्या नेत्याने हा व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. सदर व्हिडीओतील व्यक्ती हे मध्य प्रदेश सरकारमधले मंत्री बिसाहूलाल सिंह असल्याचे सांगितले जात आहे.  बिसाहूलाल हे आपल्याच कार्यकर्त्याला खिशातून रिवॉल्वर काढून धाक दाखवत आहेत. जास्त बोलशील तर गोळी मारेन, अशी धमकीसुद्धा त्यांनी दिली आहे. ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आता भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण या प्रकाराबाबत काँग्रेस नेत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. "सौंदर्यवान पत्नी हवी", उद्योगपतीनं जाहिरात दिली, अन् एका चुकीमुळे नेटिझन्सनी उडवली खिल्ली

दरम्यान बिसाहूलाल सिंह सध्या शिवराज सिंह सरकारमध्ये असून ते पोटनिवडणुकीसाठी उभे आहेत. अनुपपूरच्या जागेवरून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या व्हिडीओत एका कार्यकर्त्याला  पैसे आणायला ते सांगत आहेत. या व्हिडीओबाबत शहानिशा अद्याप झालेली नाही. तरीसुद्धा काँग्रेसकडून हा VIDEO शेअर करण्यात आला आहे.  मास्क लावला नाही म्हणून या बाईला विमानातून हाकललं, अन् रागाच्या भरात तिनं काय केलं पाहा....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP candidate bisahulal singh showing revolver congress set to complain election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.