खतरनाक! रेल्वेतून उतरण्याची अशी पद्धत कधी पाहिली नसेल, प्रवाशांचा कारनामा व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:29 IST2026-04-02T15:29:05+5:302026-04-02T15:29:43+5:30
Viral Video : सध्या व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात रेल्वेतून उतरण्याची जी पद्धत बघायला मिळते ती आपण आधी कधी पाहिली नसेल.

खतरनाक! रेल्वेतून उतरण्याची अशी पद्धत कधी पाहिली नसेल, प्रवाशांचा कारनामा व्हायरल
Viral Video : रेल्वेने प्रवास करणं हा एक फारच वेगळा अनुभव देणारा असतो. लांबचा प्रवास असेल तर अधिकच मजा येते. एक एक करत नवनवीन रेल्वे स्टेशन येत राहतात. त्या त्या ठिकाणचे लोक रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उतरतात आणि नवीन प्रवासी रेल्वे बसतात. यासाठी रेल्वे स्टेशन उभारलेलं असतं. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. प्लॅटफॉर्मवरूनच रेल्वेत बसले असाल आणि उरतानाही प्लॅटफॉर्मवरच उतरले असाल. पण सध्या व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात रेल्वेतून उतरण्याची जी पद्धत बघायला मिळते ती आपण आधी कधी पाहिली नसेल. लोक रेल्वेतून ज्या पद्धतीने उतरत आहेत, ते बघून नक्कीच अवाक् व्हायला होतं.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण बघू शकतो की, रेल्वे ट्रॅकवर थांबलेली आहे. रेल्वेच्या आत तर लोक आहेतच, सोबतच छतावरही कितीतरी लोक बसलेले आहेत. आता रेल्वेच्या डब्यात बसलेले लोक तर गेटमधून खाली उतरतील. पण छतावर बसलेले लोक कसे उतरतील. आपण बघू शकता की, हे लोक रेल्वेच्या बाजूला लावलेल्या खांबांना लटकून खाली उतरत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे सध्या समजू शकलेलं नाही. पण व्हिडिओतील लोकांचा प्रकार पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत.
संसाधनों की कमी है या फिर जनसंख्या विस्फोट, कहाँ की तस्वीर हो सकती है ये pic.twitter.com/kNRnqB6bBI
— Geeta Patel (@geetappoo) March 31, 2026
हा व्हायरल झालेला व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @geetappoo नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तर याच्या कॅप्शनला लिहिण्यात आलंय की, 'साधनांची कमतरता आहे की मग लोकसंख्या विस्फोट, कुठला फोटो असू शकतो'. आतापर्यंत एक्सवर हा व्हिडीओ ५८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर अनेकांनी यावर अनेक कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'हे चित्र बांगलादेशमधील आहे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'बांगलादेश आहे'. तर तिसऱ्याने गमतीने लिहिलं की, 'या लोकांनी तर NASA ला सुद्धा फेल केलं'.