Video: मध्यरात्री आली बिर्यानीची ऑर्डर; लोकेशनवर पोहोचताच डिलिव्हरी बॉय घाबरला, नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:16 IST2026-02-04T14:14:32+5:302026-02-04T14:16:22+5:30

Video : मध्यरात्री स्मशानभूमीत फूड डिलिव्हरी? व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ

Biryani order came at midnight; Delivery boy got scared as soon as he reached the location, what exactly happened? Watch Video | Video: मध्यरात्री आली बिर्यानीची ऑर्डर; लोकेशनवर पोहोचताच डिलिव्हरी बॉय घाबरला, नेमकं काय झालं?

Video: मध्यरात्री आली बिर्यानीची ऑर्डर; लोकेशनवर पोहोचताच डिलिव्हरी बॉय घाबरला, नेमकं काय झालं?

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून अनेक युजर्स चकीत झाले आहेत. एका फूड डिलिव्हरी बॉयला मध्यरात्री एक ऑर्डर येते. तो पार्सल घेऊन लोकेशवर पोहोचतो, पण समोरचे दृष्य पाहून प्रचंड घाबरुन पळ काढतो. याचे कारण म्हणजे, त्याला चक्क स्मशानभूमीच्या आत पार्सल घेऊन येण्यास सांगितले जाते.

Xवर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओच्या सुरुवातीला डिलिव्हरी बॉय फोनवर महिला ग्राहकाला सांगतो की, तो डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचला आहे. यावर महिला उत्तर देते, “ठीक आहे, सरळ पुढे या…” मात्र पुढे जे घडते, ते पाहून केवळ डिलिव्हरी बॉयच नव्हे, तर सोशल मीडियावरील युजर्सही अवाक झाले.

हा व्हिडिओ Xवर @choudhary_99415 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही पावले पुढे गेल्यानंतर डिलिव्हरी बॉय अचानक थांबतो आणि म्हणतो, “मॅडम पुढे स्मशानभूमी आहे!” यावर महिला म्हणते, “हो, गेटच्या आत या आणि डिलिव्हरी द्या.”

स्मशानभूमीत पार्टी? 

डिलिव्हरी बॉय मात्र भीतीपोटी आत येण्यास नकार देतो. तो आपल्या भूमिकेवर ठाम राहून महिलेला सांगतो की, तिने गेटवर येऊन पार्सल घ्यावे, अन्यथा तो ऑर्डर रद्द करेल. संभाषणादरम्यान महिला दावा करते की, ती स्मशानभूमीत “मित्रांसोबत पार्टी करत आहे.” हे ऐकून डिलिव्हरी बॉय चकित होतो आणि प्रश्न विचारतो, “लोक खरंच स्मशानभूमीत अन्न मागवतात का?” यानंतर डिलिव्हरी बॉय शांतपणे आत येण्यास नकार देतो. 

युजर्सची प्रतिक्रिया

या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी डिलिव्हरी बॉयच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी अशा ठिकाणी डिलिव्हरी का सेट करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला. एका युजरने म्हटले, “लोक अनेकदा विसरतात की, डिलिव्हरी एजंट माणसंच आहेत, रोबोट नाहीत. फक्त अन्न पोहोचवण्यासाठी कुणाला स्मशानभूमीत जाण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. त्याने नकार दिला, ते त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक शांततेसाठी होते आणि तो निर्णय आदर करण्यासारखा आहे.”

दुसऱ्या युजरने कंटेंट क्रिएटर्सवर टीका करत म्हटले, “या कंटेंट क्रिएटर्सना नेमकं काय झालं आहे? व्ह्यूजसाठी कुणाला मानसिक दबावात टाकण्यापूर्वी विचार तरी करता का? जर तुम्ही किंवा तुमचा कोणी त्या परिस्थितीत असता, तर तुम्ही त्याला कंटेंट म्हणाला असता का?” काही युजर्सनी हा व्हिडिओ लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मुद्दाम स्क्रिप्टेड असल्याचा दावा केला आहे. तर काहींच्या मते हा एक प्रँक व्हिडिओ असू शकतो.
 

Web Title : कब्रिस्तान में ऑर्डर से डिलीवरी बॉय डरा; आधी रात को डिलीवरी से इनकार।

Web Summary : एक फूड डिलीवरी बॉय को कब्रिस्तान में आधी रात का ऑर्डर मिला। पहुँचने पर, वह स्थान से डर गया और अंदर जाने से इनकार कर दिया। ग्राहक ने दावा किया कि वह दोस्तों के साथ पार्टी कर रही थी, जिससे डिलीवरी बॉय और ऑनलाइन दर्शक स्तब्ध रह गए और बहस छिड़ गई।

Web Title : Delivery boy terrified by graveyard order; refuses late-night delivery.

Web Summary : A food delivery boy received a midnight order to a graveyard. Arriving, he refused to enter, spooked by the location. The customer claimed she was partying with friends, leaving the delivery boy and online viewers stunned and sparking debate.