रणवीर सिंग हा बॉलिवूडच्या सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या सिनेमातील अदाकारीसोबतच विचित्र फॅशनमुळेही नेहमी चर्चेत असतो. रंगीबेरंगी कपडे घालून तो नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. आता रणवीरसारखाच त्याचा 'भाऊ' सुद्धा सापडला आहे. अमेरिकन अभिनेता बिली पोर्टर. विचित्र फॅशनबाबात तो रणीवरपेक्षा कमी नाही.

बिली पोर्टरला नुकत्यात पार पडलेल्या एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या अवॉर्डमध्ये तो एक अनोखा सूट घालून आला होता. हा सूट पाहून सर्वांचे डोळे चकीत झालेत. कारण या सूट हिऱ्यांनी आणि क्रिस्टलने सजवला होता.

रिपोर्ट्नुसार, बिली पोर्टरने घातलेल्या सूटमध्ये ५१,०७,३९२ रूपयांचे हिरे जडले होते. तर १३०,००० रूपयांचे क्रिस्टल लावलेले होते. आता तुम्ही कल्पना करू शकता की, बघणाऱ्यांची काय स्थिती झाली असेल. असे सांगितले जात आहे की, बिलीचा हा सूट तयार करण्यासाठी १७० तास लागले होते.

हॉलिवूड रिपोर्टरने दिलेल्या वृत्तानुसार, बिलीचा हा सूट लग्झरी ब्रॅन्ड मायकल कॉर्सने तयार केला होता. कंपनीने सांगितले की, 'आम्ही बिलीकडे गेलो आणि आम्ही त्याला विचारलं की, त्याला एमी अवॉर्डसाठी आमच्यासोबत जुळायला आवडेल का? आम्हाला त्याला ७० च्या दशकातील डिस्कोचा लूक द्यायचा होता'.


Web Title: Billy porters Emmy awards suit was embellished with 130000 crystals and diamonds
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.