Funny Video : चालान फाडणारच होता पोलिसवाला, बाइकस्वाराने दिला असा चकमा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:54 IST2021-03-17T15:48:48+5:302021-03-17T15:54:53+5:30
Social Viral : १५ सेकंदाच्या या व्हिडीओत एक पोलिसवाला दिसत आहे आणि त्याच्या बाजूला ३ लोक उभे आहे. हे बघून असं वाटत आहे की, तिघांचं चालान फाडलं गेलं असेल.

Funny Video : चालान फाडणारच होता पोलिसवाला, बाइकस्वाराने दिला असा चकमा!
इंटरनेटच्या विश्वात कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. खासकरून मीम्स आणि जोक्सची दुनियाच वेगळी आहे. इथे काहीना काही रोज नवीन बघायला मिळतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ Video Nation नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं की, असा स्टंट सर्वांनी आपल्या लाइफमध्ये एकदा तरी केला असेल. पण असा स्टंट करणं चुकीचंच आहे. कारण ट्रिपल सीट प्रवास करणं हा गुन्हाच आहे. (हे पण बघा : Social Experiment! तरूण मुलीचं रस्त्यावर करत होता किडनॅप, बघा लोकांनी यावेळी काय केलं!)
१५ सेकंदाच्या या व्हिडीओत एक पोलिसवाला दिसत आहे आणि त्याच्या बाजूला ३ लोक उभे आहे. हे बघून असं वाटत आहे की, तिघांचं चालान फाडलं गेलं असेल. अशात दुसऱ्या बाजूने एका बाइकवर तीन लोक येताना दिसतात. त्या तिघांना एका बाइकवर येताना बघून पोलिसवाला रस्त्याच्या मधे जातो. इतक्यात बाइकस्वार काय होणार हे लक्षात घेऊन तिथेच गाडी टर्न करून पळून जातो. पोलीस त्यांना बोलवतच तिथे उभा राहतो. (हे पण बघा : हजार रुपये घ्या, पण मला खाली उतरवा; पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल)
या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिकिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, मी सुद्धा हे केलं आहे. मी तर घाबरून स्मशानात पोहोचलो होतो'. तर एका यूजरने लिहिले की, हे तर मुंबईत रोजचं आहे'. तर अनेकांनी हे मजेदार नाही तर चुकीचंच असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी ट्रॅफिकचे नियम पाळण्याचे सांगितले.