VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:19 IST2025-12-10T13:19:35+5:302025-12-10T13:19:59+5:30
Wedding firing viral video: वरमाला विधी सुरु असतानाच काकूंनी स्टेजवर पिस्तूल काढली अन्...

VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Wedding firing viral video: लग्न समारंभाचा एक हाय-व्होल्टेज व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनाही धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये जे घडते ते पाहून सोशल मीडियावर प्रचंड वादविवाद सुरू आहेत. बिहारमधील समस्तीपूर येथील या व्हायरल व्हिडिओअसून, यात वधू आणि वर यांचा लग्नातील हार घालण्याचा विधी सुरु असतानाच, एक महिला अचानक पिस्तुल वरच्या दिशेने धरून हवेत पाच गोळ्या झाडते. तिथे असलेल्या पाहुण्यांसाठी ही बाब फारशी धक्कादायक असल्याचे वाटत नाही. पण नेटकरी यावर व्यक्त होत आहेत.
व्हिडीओमध्ये काय घडतं?
व्हायरल व्हिडिओ क्लिप अवघ्या काही सेकंदांचा आहे. वधू आणि वर स्टेजवर उभे असल्याचे दिसतात. जवळच एक काकू उभ्या असतात. त्या पाहुण्यांकडे पाहून आधी हसतात. नंतर अचानक त्या कमरेला लावलेले पिस्तूल काढतात आणि न डगमगता हवेत पाच राउंड गोळीबार करतात. काही सेकंदासाठी लोक हा प्रकार पाहतात. त्यानंतर ती काकू पाच गोळ्या हवेत झाडून पिस्तूल दुसऱ्याकडे देते. त्यानंतर पुन्हा सर्वकाही सुरळीत सुरु होते, जसेकी काहीच वेगळे घडले नाही. पाहा व्हिडीओ-
सध्या हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया साईट्स आणि प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडीओवर लोक कमेंट करताना दिसत आहेत. हा प्रकार बिहारमध्ये घडला असल्याचा दावा करण्यात आला आहे. लग्नसमारंभात पिस्तूलाची कमाल असेही यात लिहिले जात आहे.