VIDEO: पठ्ठ्यानं एकाच वेळी फोडले तब्बल १००० फटाके! मग काय झालं एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 13:24 IST2022-10-07T13:22:51+5:302022-10-07T13:24:02+5:30

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. रात्रीच्या अंधारात काही तरुण एकाच वेळी तब्बल १ हजार फटाके फोडले.

biggest sky shot firecrackers of 86 thousand rupees burst in sky video | VIDEO: पठ्ठ्यानं एकाच वेळी फोडले तब्बल १००० फटाके! मग काय झालं एकदा पाहाच...

VIDEO: पठ्ठ्यानं एकाच वेळी फोडले तब्बल १००० फटाके! मग काय झालं एकदा पाहाच...

नवी दिल्ली-

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. रात्रीच्या अंधारात काही तरुण एकाच वेळी तब्बल १ हजार फटाके फोडले. या फटाक्यांची एकूण किंमत ८६ हजार रुपये इतकी होती. एकाचवेळी जेव्हा १ हजार फटाके फोडले गेले तेव्हा आकाशातील दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं होतं. जवळपास ३ मिनिटं २६ सेकंदांपर्यंत आकाशात ही आतषबाजी सुरू होती आणि काळ्याकूट्ट आकाशात विविध रंगांनी रंग भरलेले पाहायला मिळाले. 

ड्रोननं यावेळी एरिअल शूट देखील करण्यात आलं आणि ते पाहणं लक्षवेधी ठरलं. हा व्हिडिओ Crazy XYZ यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. ज्यास आतापर्यंत ३० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे चॅनल राजस्थानचा तरुण यूट्यूबर अमित शर्मा चालवतो. अमित एक फेमस यूट्यूबर आहे. त्याचे २ कोटींहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. अमित नेहमीच आपल्या चॅनलवर असे हटके व्हिडिओ अपलोड करत असतो. 

अमितच्या व्हिडिओंना नेटिझन्सची चांगली पसंती देखील मिळते. प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात. अमितच्या व्हिडिओंना आतापर्यंत ६२१ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. अमितच्या एका व्हिडिओला तर तब्बल ६३ लाख व्ह्यूज मिळाले होते. 

१ हजार शॉर्ट्स आणि रात्रीचा झाला दिवस!
एकाच वेळी तब्बल १ हजार शॉर्ट्स फोडले गेल्यानं रात्रीच्या अंधाराला सारून लख्ख प्रकाश आकाशात पाहायला मिळाला होता. जणू काही मिनिटांसाठी रात्रसारून दिवस उजाडल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

Web Title: biggest sky shot firecrackers of 86 thousand rupees burst in sky video