शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

मागे मंडपाला लागलीये आग अन् हे भाऊ जेवणावर मारतायत ताव, आगीची फिकिरच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:31 IST

मांडवाला आग लागलेली असतानाही, तरुण जेवणावर ताव मारताना मग्न दिस आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडिया असा मंच झाला आहे, जिथं कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मोबाईलवर व्हिडीओ काढला की अपलोड होतो, आणि ज्या गोष्टी एरवी समजणारही नाही त्या जगासमोर येतात. असाच काहीसा प्रकार भिवंडीत पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मांडवाला आग लागलेली असतानाही, तरुण जेवणावर ताव मारताना मग्न दिस आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न मंडपात काही तरुण टेबल-खुर्चीवर बसून जेवत आहे, त्यांच्या समोर विविध पदार्थ ठेवलेले आहे, आणि ते त्यावर मनमुराद ताव मारत आहेत, पण अगदी याच व्हिडीओच्या मागे आपण पाहू शकतो की, लग्नमंडप पेटला आहे, लोकांची आरडाओरड सुरु आहे, पण या भावांना त्याचं काही देणं-घेणं दिसत नाही, त्यांना दिसतं आहे ते केवळ समोर ठेवलेलं जेवण. हा व्हिडीओ पाहून, नेटकरी पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

भिवंडीत २९ नोव्हेंबरला रात्री ही आगीची घटना घडली. इथल्या अंसारी मॅरेज हॉलला रात्री आग लागली. आग लागल्यानंतर याची माहिती तातडीने मनपाला देण्यात आली, आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या, ज्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत मॅरेज हॉलचं मोठं नुकसान झालं आहे, या आगीत लग्नातील शोभेच्या सगळ्या वस्तू, खुर्च्या जळून खाक झाल्या. शिवाय, हॉलशेजारी उभ्या असणाऱ्या ६ गाड्या जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ही आग लग्नात वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मात्र, एकीकडे एवढा सगळा राडा होत असताना, लग्न मंडपात हे तरुण आरामात जेवणावर ताव मारत होते, त्यांना आगीशी काही देणं घेणं नसल्याचं दिसत होतं, त्यामुळे नेटकरी यावर पोट धरुन हसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाfireआगFire Brigadeअग्निशमन दलfire crackerफटाके