इम्रान खान यांची 'हूर'वरून हुर्यो; नेटकऱ्यांनी टोचलं असं 'इंजेक्शन' की पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 12:05 IST2020-01-30T12:03:52+5:302020-01-30T12:05:18+5:30

पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेलं विधान वाचून काय बोलावं आणि काय नाही असं होईल.

Best and funny comments on Pakistani PM Imran Khan viral video | इम्रान खान यांची 'हूर'वरून हुर्यो; नेटकऱ्यांनी टोचलं असं 'इंजेक्शन' की पोट धरून हसाल!

इम्रान खान यांची 'हूर'वरून हुर्यो; नेटकऱ्यांनी टोचलं असं 'इंजेक्शन' की पोट धरून हसाल!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यावरून वेगवेगळे वाद होतात. असंच आणखी वादग्रस्त विधान इम्रान खान यांनी केलं आहे. त्यावरून ते नेहमीप्रमाणे ट्रोलही होत आहेत. पण यावेळी त्यांनी केलेलं विधान हे नेहमीपेक्षा फारच वेगळं आणि हास्यास्पद असं आहे. 

ते म्हणाले की, 'माझं पाठीचं हाड मोडलं होतं. मी फार त्रासात होतो. डॉक्टर आसिमने मला कोणतं तरी इंजेक्शन दिलं. या इंजेक्शनमुळे माझा त्रासच दूर झाला. माझं जगच बदललं...नर्सेस मला परीसारख्या दिसू लागल्या'. त्यांच्या या विधानावरून लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. या कमेंट अशा आहेत की, हसून हसून तुमचं पोट दुखू लागेल.

आधीच पाकिस्तानात आर्थिक मंदी आलेली असताना देशाचे पंतप्रधान अशाप्रकारं विधान करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संतापही व्यक्त केला जात आहे.


Web Title: Best and funny comments on Pakistani PM Imran Khan viral video