video: विना हेल्मेट स्कूटी चालवताना पकडले; संतापलेल्या व्यक्ती पोलिसांना चावला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:06 PM2024-02-13T18:06:53+5:302024-02-13T18:08:25+5:30

Traffic Police: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bengaluru Traffic Police viral video: Caught riding scooter without helmet; The enraged person bit the police | video: विना हेल्मेट स्कूटी चालवताना पकडले; संतापलेल्या व्यक्ती पोलिसांना चावला

video: विना हेल्मेट स्कूटी चालवताना पकडले; संतापलेल्या व्यक्ती पोलिसांना चावला

Bengaluru Traffic Police: ट्रॅफिक पोलिस अनेकदा विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्यांना पकडतात. अशा नियम मोडणाऱ्यांना कधी फाईन घेऊन सोडतात, तर कधी फक्त समज देऊन सोडतात. अनेकदा यामुळे वादही झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, बंगळुरुमधील एका तरुणाने चक्क ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्याचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद रफी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी विल्सन गार्डन क्रॉसजवळ विना हेल्मेट स्कूटर चालवताना पकडले. यावेळी त्या व्यक्तीने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. अधिकाऱ्याने त्याच्या गाडीची चावी काढताच तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने पोलिसाचे बोट चावले. वाहतूक पोलिस अधिकारी सिद्धेश्वर कौजलगी यांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.

या घटनेनंतर सय्यद रफीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, धमकावणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Web Title: Bengaluru Traffic Police viral video: Caught riding scooter without helmet; The enraged person bit the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.