Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:21 IST2025-06-16T15:19:02+5:302025-06-16T15:21:14+5:30
Bengaluru Rapido Driver Viral Video: या घटनेनंतर पोलिसांनी रॅपिडो चालकाविरोधात तक्रार दाखल केली.

Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
Bengaluru Rapido Driver Slaps Woman Viral Video: गेल्या काही काळापासून कर्नाटकात हिंदी आणि कन्नड भाषावादाचा मुद्दा चर्चेत आला आहे. हा मुद्दा आता थेट मारहाणीपर्यंत वाढले आहे. राजधानी बंगळुरुत एका रॅपिडो बाईक चालकाने महिलेला थेट कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी नोंदवला एनसीआर
बाईक व्यवस्थित चालव, असे सांगितल्यामुळे वाद झाल्याचे बोलले जात आहे. पीडित महिला सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास घाबरत होती, परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी धीर दिल्यानंतर या प्रकरणाचा एनसीआर (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) नोंदवण्यात आला आहे.
Bengaluru @rapidobikeapp bike rider slaps customer as she allegedly questions him over rash driving and jumping signal
— nikesh singh (@nikeshs86) June 16, 2025
Lady falls to the ground after Rapido rider slaps her hard pic.twitter.com/eM4aec1NzW
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला इंग्रजीत बोलत असल्याचे दिसून येते, तर रायडर कन्नडमध्ये उत्तर देतोय. भाषेतील या मतभेदामुळे वाद आणखी वाढला आहे. यानंतर त्या रॅपिडो चालकाने थेट महिलेच्या गालात जोरदार चापट मारली, ज्यामुळे महिला खाली कोसळली.
२०२४ मध्येही घडलेली घटना
सप्टेंबर २०२४ मध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. बंगळुरुमध्ये एका ओला ऑटो चालकाने महिलेवर हल्ला आणि असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली होती. महिलेने अॅपवर केलेले बुकिंग रद्द केले, तेव्हा चालकाने तिला मारहाण केली. त्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.