VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:44 IST2025-08-19T12:43:34+5:302025-08-19T12:44:36+5:30

हा व्हिडिओ jeejaji नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे.

beauty of a transgender was seen in the train and discussion started on social media video goes viral You will also be amazed | VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!

VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक सुंदर किन्नर (ट्रान्सजेंडर) दिसत आहे. एवढी सुंदर की एखाद्या मिथकातून पृथ्वीवर उतरल्यासारखी वाटावी.

ट्रेनमध्ये पैसे मागण्यासाठी आली सुंदर किन्नर -
व्हिडिओमध्ये, गुलाबी साडी परिधान केलेली एक सुंदर किन्नर ट्रेनच्या डब्यात टाळ्या वाजवत फिरताना आणि पैसे मागताना दिसत आहे. गोरीपान आणि तेजदार चेहरा असलेली ही किन्नर पाहून प्रवाशांना तर आश्चर्य वाटलेच, पण नेटकरीही या किन्नरच्या सौंदर्यावर 'फिदा' झाले आहेत. लोक म्हणत आहेत, स्वर्गातील अप्सराही या किन्नरच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतील. कमेंट सेक्शनमध्ये कुणी या किन्नरला "ट्रेनची राणी" म्हणत आहे, तर कुणी "बॉलीवुड हिरोइन पेक्षाही सुंदर म्हणत आहे."

सर्वत्र सौंदर्याची चिर्चा, लोक वारंवार बघतायत व्हिडिओ -
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडिओ वारंवार बघत आहे आणि शेअर करत आहेत. तसेच, ही किन्नर कोण? कुठूण आली? यासंदर्भातही चर्चा होताना दिसत आहे.


सोशल मीडिया युजर्स करताय कौतुक - 
हा व्हिडिओ jeejaji नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हिडिओ लाइकही केले आहे आणि शेअरही केले आहे. यातच या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंटदेखील येत आहेत. एक युजरने लिहिले, मुलगी आहे, अॅक्टिंग करून पैसे कमावत आहे. आणखी एका युजरने लिहिले, ही किन्नर तर नाही, तिने रिल बनवण्यासाठी असे केलेले असू शकते. तसेच आका युजरने लिहिले, एवढी सुंदर किन्नर आजवर बघितली नाही.

Web Title: beauty of a transgender was seen in the train and discussion started on social media video goes viral You will also be amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.