Backflips in a saree : जबरदस्त! कमरेला साडीचा पदर खोचला अन् केला खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:12 IST2021-04-12T18:05:19+5:302021-04-12T18:12:41+5:30
Backflips in a saree viral video : मुलींना साडी नेसून चालायचं म्हणजे खूप अवघड काम वाटतं. पण या महिलेन मात्र भन्नाट स्टंट करत सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.

Backflips in a saree : जबरदस्त! कमरेला साडीचा पदर खोचला अन् केला खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
डान्सर रुक्मिणी विजयकुमारनं सोशल मीडियावर एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चक्क साडी घालून या महिलेनं बॅकफ्लिप (Dancer Performing Splits And Backflips In A Saree) मारले आहे. तेही अगदी सहज सोप्या पद्धतीनं मारावेत अशा पद्धतीनं मारत आहे. साडी नेसून हा स्टंट केल्यामुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकीकडे मुलींना साडी नेसून चालायचं म्हणजे खूप अवघड काम वाटतं. पण या महिलेन मात्र भन्नाट स्टंट करत सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.
याआधीही तिने व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या व्हिडीओत विजयकुमारनं स्प्लिट्स, हेडस्टँड, बॅकफ्लिप आणि वेगवेगळे स्टंट करतानाचा दृश्य पाहायला मिळाले होते. जे आरामदायाक कपड्यांमध्ये करणं कठीण असतं. ते तिनं साडीत करून दाखवलं होतं. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा स्टंट मी साडी नेसूनही करू शकते. मागच्यावर्षीही जागतिक योगा दिनानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याच्यामागे हा सीन आहे.' सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..
हा व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तर ८२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. हजारो लोकांनी कौतुक करत कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ अद्भूत, तर कोणी अविश्वसनीय असल्याचं म्हटलं आहे. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार