या चिमुकलीने घातला पहिल्यांदा चष्मा, त्यानंतर दिली अशी रिअ‍ॅक्शन की लोक म्हणाले...awww!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:24 IST2021-09-08T19:20:18+5:302021-09-08T19:24:24+5:30

सध्या एक लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी पहिल्यांदाच चष्मा घातले आणि चष्मा घातल्यानंतरचा तिचा आनंद पाहुन तुम्ही तिच्या प्रेमातच पडाल...

baby small girl wears glasses for the firs time and gives cute reaction, video goes viral | या चिमुकलीने घातला पहिल्यांदा चष्मा, त्यानंतर दिली अशी रिअ‍ॅक्शन की लोक म्हणाले...awww!

या चिमुकलीने घातला पहिल्यांदा चष्मा, त्यानंतर दिली अशी रिअ‍ॅक्शन की लोक म्हणाले...awww!

लहान मुलांची प्रत्येक गोष्ट खास असते. जगातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांच्या गोंडस गोष्टी आवडतात. सोशल मीडियावर नेहमीच लहान मुलांचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. विशेष म्हणजे लोकांना हे लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ जास्त आवडतात.  सध्या असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी पहिल्यांदाच चष्मा घातले आणि चष्मा घातल्यानंतरचा तिचा आनंद पाहुन तुम्ही तिच्या प्रेमातच पडाल...

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता, ही मुलगी तिच्या वडिलांच्या कडेवर आहे. जेव्हा दुकानदार पहिल्यांदा मुलीच्या डोळ्यांवर चष्मा लावतो, तेव्हा ती मुलगी लगेच खूप गोंडस हसते. चष्मा घातल्यानंतरचा तिचा आनंद हा तिच्या छोट्याशा गगनात मावत नाहीये.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी प्रतिक्रियांता भडीमार केलाय. अनेक युजर्सनी लिहिलंय की, ही मुलगी खूप गोड आहे. आणि तिचे हास्य तर सुंदरच आहे. हा व्हिडिओ व्हायरल हॉग या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. 

Web Title: baby small girl wears glasses for the firs time and gives cute reaction, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.