आई ती आईच..! मृत आईला बिलगून माकडाचं पिल्लू ढसाढसा रडलं, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:54 IST2023-02-24T21:53:56+5:302023-02-24T21:54:16+5:30

ट्रकच्या धडकेत माकडाचा मृत्यू झाला, पिल्लू आईला उठवण्याचा प्रयत्न करत होते.

Assam Monkey Viral Video: Baby monkey cried on dead of his mother, see VIDEO | आई ती आईच..! मृत आईला बिलगून माकडाचं पिल्लू ढसाढसा रडलं, पाहा VIDEO

आई ती आईच..! मृत आईला बिलगून माकडाचं पिल्लू ढसाढसा रडलं, पाहा VIDEO


Assam Monkey Viral Video: माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईसाठी एक खास जागा असते. आईच्या जाण्याने माणसाप्रमाणे प्राणीही भावूक होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माकडाचं पिल्लू आपल्या मृत आईला बिलगून जोराने ओरडत आहे. जणून काही तो आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पानावतील...

आसाममधील काकोइजाना राखीव वनक्षेत्रातून विटा घेऊन जाणाऱ्या वाहनाला झालेल्या अपघातात एका माकडाचा मृत्यू झाला. या अपघातात माकडाचे पिल्लू बचावले. यानंतर ते माकड आपल्या आईला बिलगून रडू लागलं, त्याच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट दिसत होत्या. व्हिडिओ IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना नंदा यांनी लिहिले की, या वेदना मला खूप दिवस छळतील...

कोणाचेही डोळे ओलावून टाकणारा हा व्हिडीओ पाहून हे मुल तिथे उभ्या असलेल्या लोकांना आपल्यासोबत असे का झाले, असे विचारत असल्याचा भास होतो. आईला उठवण्यासाठी पिल्लू जिवाच्या अकांताने ओरडत होतं, पण त्याची आई कधीच परतणार नाही याची जाणीव त्याला नव्हती. 
 

Web Title: Assam Monkey Viral Video: Baby monkey cried on dead of his mother, see VIDEO