माधुरीचा जबरा फॅन! जिभेने काढलं तिचं हुबेहुब चित्र, बघाल तर बघतच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 09:58 IST2024-04-05T09:31:06+5:302024-04-05T09:58:50+5:30

Viral Video : माधुरीच्या एका फॅनने जिभेच्या मदतीने माधुरीचं एक चित्र काढलंय. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

Artist draws Madhuri Dixit picture with his tongue video goes viral | माधुरीचा जबरा फॅन! जिभेने काढलं तिचं हुबेहुब चित्र, बघाल तर बघतच रहाल!

माधुरीचा जबरा फॅन! जिभेने काढलं तिचं हुबेहुब चित्र, बघाल तर बघतच रहाल!

Viral Video : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण तिच्या एका चाहत्याचा असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून सगळेच अवाक् झाले आहेत. तिचा हा चाहता एक कलाकार आहेत. तो एक पेंटर आहे. पण तो हाताने पेंटिंग करत नाही तर तो पेंटिंग करण्यासाठी आपल्या जिभेचा वापर करतो. त्याने जिभेच्या मदतीने माधुरीचं एक चित्र काढलंय. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

Saurav Vijay patel नावाच्या यूजरच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत तरूण वर लावलेल्या माधुरीच्या फोटोकडे इशारा करतो. त्यानंतर प्लेटमध्ये असलेल्या काळ्याला जीभ लावतो आणि पेपरवर चित्र काढण्यास सुरूवात करतो. आधी केस, मग डोळे, नाक, ओठ आणि नंतर दात काढतो. माधुरीचं हुबेहुब चित्र तो काढतो.

व्हिडिओला 2.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि 1 लाख 76 हजार लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओच्या कमेंटमध्ये लोकांना या कलाकाराचं खूप कौतुक केलं आहे. अनेकांना तर त्याच्या या टॅलेंटवर विश्वासही बसत नाहीये.

Web Title: Artist draws Madhuri Dixit picture with his tongue video goes viral