पाकिस्तानातील हा चहावाला सोशल मीडियात झाला होता स्टार, बघा आता काय करतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 11:40 IST2020-10-06T11:39:50+5:302020-10-06T11:40:15+5:30

आता हा तरूण काय करतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अरशदने इस्लामाबादमध्ये चहाचा एक झक्कास कॅफे सुरू केलाय. ज्याचं नाव आहे चायवाला रूफ टॉप. 

Arshad Khan the Pakistani chaiwala famous for his looks he launched his own cafe | पाकिस्तानातील हा चहावाला सोशल मीडियात झाला होता स्टार, बघा आता काय करतो!

पाकिस्तानातील हा चहावाला सोशल मीडियात झाला होता स्टार, बघा आता काय करतो!

फोटोतील हा चेहरा तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल? पाकिस्तानात कधी चहा विकायचा हा तरूण. चार वर्षांआधी याच्या निळ्या डोळ्यांनी आणि गजब स्माइलने तो रातोरात सोशल मीडिया स्टार झाला होता. मग काय अरशदला मॉडलिंग, टेलिव्हिजनवर काम मिळू लागलं. आज त्याचे जगभरात फॅन्स आहेत. पण आता हा तरूण काय करतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अरशदने इस्लामाबादमध्ये चहाचा एक झक्कास कॅफे सुरू केलाय. ज्याचं नाव आहे चायवाला रूफ टॉप. 

त्याने एका मुलाखतीत सांगितले की, 'अनेक लोकांनी मला सांगितले की, कॅफेचं नाव बदलून अरशद खान ठेव. पण मी नकार दिला. कारण चायवाला ही माझी ओळख आहे'. अरशदच्या कॅफेचं इंटेरिअर देसी टाइपचं आहे. इथे चहासोबतच काही खास पदार्थही खायला मिळतात. सध्या अरशद त्याचा जास्तीत जास्त वेळ कॅफेमध्येच घालवतो. सोबतच मनोरंजन विश्वातील काही प्रोजेक्ट्सही करतो आहे. 

अरशदचा फोटो २०१६ मध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर Jiah Ali यांनी काढला होता. नंतर हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. इतका हॅंडसम चहावाला पाहून अनेकजण त्याचे फॅन्स झाले होते. या फोटोने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.

अरशद या व्हिडीओत म्हणतो की, 'मी अरशद खान चायवाला. ज्या क्षेत्रातही तुम्हाला जायचं असेल त्याआधी शिक्षण पूर्ण करा. मी शिक्षण घेऊ शकलो नाही याचा मला नेहमीच पश्चाताप होतो'. अरशदमध्ये झालेल्या या बदलाने लोक हैराण झाले आहेत. 
 

Web Title: Arshad Khan the Pakistani chaiwala famous for his looks he launched his own cafe