Ants carrying the gold chain : 'सगळ्यात छोटा गोल्ड स्मगलर'! सोन्याची चेन उचलून नेत होत्या मुंग्या; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:16 IST2021-03-25T16:51:26+5:302021-03-25T17:16:51+5:30
Ants carrying the gold chain :सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना असा व्हिडीओ समोर आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ants carrying the gold chain : 'सगळ्यात छोटा गोल्ड स्मगलर'! सोन्याची चेन उचलून नेत होत्या मुंग्या; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले.....
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज असे असतात जे पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही. सोशल मीडियावर असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुंग्या एक सोन्याची चेन उचलून घेऊन जात आहेत. सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना असा व्हिडीओ समोर आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Smallest Gold Smugglers! 😅 pic.twitter.com/6kBASYP0si
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 24, 2021
हा व्हिडीओ दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'हा सगळ्यात लहान गोल्ड स्मगलर आहे.' या व्हिडीओमध्ये मुंग्या सोन्याची चेन खेचून घेऊन जाताना दिसून येत आहेत. मुंग्यासुद्धा असा प्रकार करू शकतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीलोला ४ हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं आहे. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट
लोक हा व्हिडीओ पाहून गमतीदार कमेंट्सही करत आहे. एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, आता या मुंग्यावर कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई केली जाणार? आणखी एका वापरकर्त्यानं म्हटलं की, प्रयत्न करणाऱ्यांची हार कधीच होत नाही असं म्हटलं आहे. या व्हिडीओतून तुम्हाला एकीचे बळ नक्कीच दिसून येईल. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट